Akola : भाजप आमदाराचा नवा लूक, नगरपालिकेत यश खेचून आणलं अन्..., वाचा नेमकं काय झालं

BJP MLA Harish Pimple : अकोल्यातील मूर्तिजापूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार हरीष पिंपळे यांचं नवं लूक सोशल मिडियावर खूप व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे. त्यांनी दाढी काढल्यानंतर फोटो कॅप्शन देत सोशल मीडियावर शेअर केले आहे.
Akola
Akola SAAM TV
Published On

अक्षय गवळी, साम टीव्ही प्रतिनिधी

अकोल्यातील मूर्तिजापूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार हरीष पिंपळे यांचं नवं लूक समोर आलंय.आमदार पिंपळे यांनी एक निर्णय घेतला, 'जोपर्यंत माझ्या कार्यकर्त्यांचा विजय होणार नाही, तोपर्यंत आपण दाढी (सलून) करणार नाहीये. अशी मनोकामना वर्षाभरापूर्वीचं भाजपचे आमदार पिंपळे यांनी घेतली.जवळपास वर्षभरापासून पिंपळे यांनी दाढी केलीच नव्हती. मूर्तिजापूर नगरपालिका निवडणुकीत पिंपळे यांनी सभांचा धडाका लावला आणि अखेर भाजपला मोठ यश या ठिकाणी मिळून दिलं. नगरपालिका निवडणुकीत भाजपचा नगराध्यक्ष आणि 11 नगरसेवक निवडून आणले.

Akola
Mahapalika Election : एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाण यांच्यात पहाटे ४ वाजेपर्यंत बैठक, राज्यातील जागावाटपावर शिक्कामोर्तब?

त्यानंतर आज आमदार पिंपळे यांनी वाढलेली दाढी सलूनमध्ये जात काढली. आता भाजप आमदार हरीष पिंपळे यांचं नवं लूक समोर आलं. अन तेही सोशल मीडियावर मोठं वायरल होत आहे. कार्यकर्त्यांबद्दल घेतलेली मनोकामना अर्थातच व्यक्त केलेली इच्छा पिंपळे यांनी पूर्ण करून दाखवले. यावेळी सलूनमध्ये भाजप आमदार दाढी करण्यासाठी गेले असता कार्यकर्त्यांनी सलूनमध्ये मोठी गर्दी केली होती. त्यांनी दाढी काढल्यानंतर पिंपळे यांनी अनेक फोटो कॅप्शन देत सोशल मीडियावर शेअर केले आहे.

नेमकं काय म्हटलं आमदाराने?

सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं!, आजचा दिवस मुर्तिजापूरच्या राजकीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल, भाजप विचारधारेवर विश्वास ठेवून जनतेने ऐतिहासिक कौल दिलाये. आमचा तरुण, तडफदार आणि निष्ठावान कार्यकर्ता हर्षल साबळे हा मुर्तिजापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी विराजमान झाला, ही सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. केवळ नगराध्यक्षच नाही, तर भाजपच्या 11 नगरसेवकांनी विजय मिळवून नगरपालिकेत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे.

Akola
Mahapalika Election : ठाकरे बंधू युतीची घोषणा करण्याआधीच बालेकिल्ल्यात महायुतीची घोषणा, २ दिवसात जागावाटप

'माझी 'मन्नत' अन हा विजय'...

जेव्हा मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवत होतो, तेव्हा काही स्वकीयांनी आणि विरोधकांनी मला पाडण्याचे प्रयत्न होते. त्या कठीण काळात एक निश्चय केला होता आणि 'मन्नत' मागितली. जोपर्यंत या विरोधकांना धडा शिकवून माझ्या कार्यकर्त्यांचा विजय होत नाही, तोपर्यंत आपण 'दाढी' वाढवून ठेवेन. आज हर्षलसह 11 शिलेदारांनी हा दैदिप्यमान विजय मिळवला आहे, तेव्हा ही मन्नत पूर्ण झाली. अन्यायाविरुद्ध आणि गद्दारीविरुद्ध पुकारलेल्या या लढ्याचा आज सुखद शेवट झाला, आज दाढी काढून विजयाचा आनंद साजरा करत असल्याचे आमदार पिंपळे म्हणाले.

भाजपमधीलच काही घरभेद्यांकडून प्रयत्न?

अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुरमध्ये झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे हर्षल साबळे विजय झाले. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढाईत त्यांनी वंचितच्या उमेदवाराचा 718 मतांनी पराभव केला. मात्र, या पराभवानंतर भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांनी हर्षल साबळे यांच्या पराभवासाठी पक्षातीलच काही घरभेद्यांनी प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला. हर्षल साबळे हे आमदार हरीश पिंपळे यांच्या कट्टर समर्थक समजले जातात. त्यांना उमेदवारी दिल्यानंतर पक्षातील त्यांच्या विरोधात काम करणाऱ्या चार प्रमुख पदाधिकाऱ्यांना पक्षाने निलंबित केलं होतं.

Akola
Konkan politics : ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख, नगराध्यक्ष झाले, निकालाच्या तिसऱ्या दिवशी थेट शिंदेंच्या भेटीला, कोकणात धमाका होणार

यात मावळत्या नगराध्यक्ष मोनाली गावंडे यांचे पती कमलाकर गावंडे यांचाही समावेश होताष. निलंबित झालेले चारही पदाधिकारी हे भाजपातील धोत्रे समर्थक समजले जातात. या पार्श्वभूमीवर आमदार पिंपळे यांनी केलेल्या आरोपांची मोठी चर्चा भाजपा आणि राजकीय वर्तुळात सुरूये. साबळे यांच्या विजयाने घरभेद्यांना त्यांनी जोरदार चपराक लावत मूर्तीजापूरच्या जनतेने चांगलाच धडा शिकवल्याचं आमदार हरीष पिंपळे म्हणाले होते. उमेदवारांच्या विजयानंतर भाजपकडून करण्यात आलेल्या जल्लोषावेळी ते बोलत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com