Language Controversy: भाजपला मंत्र्यानेच पाडलं तोंडघशी; मंत्री अशोक उईकेंचा हिंदी बोलण्यास नकार

BJP Minister Ashok Uike refuses to speak in Hindi: ठाकरेंनी मराठीसाठी एल्गार पुकारलाय. तर दुसरीकडे भाजपच्या मंत्र्यांनीच हिंदीसक्तीचा धसका घेतलाय. तो नेमका कसा? पाहूयात.
Language Controversy
BJP Minister Ashok Uike refuses to speak in Hindi
Published On

सरकारने पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेतल्याने विरोधकांनी सरकारला घेरलंय. तर सरकारकडून हिंदी भाषेचं महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र भाजप मंत्री अशोक उईकेंनी हिंदीत बोलण्यास नकार देत फक्त मराठीतूनच बोलणार असल्याचं स्पष्ट केलंय.

राज्य सरकारने पहिलीपासूनच त्रिभाषा सुत्रानुसार हिंदी भाषेची सक्ती केलीय . त्याविरोधात ठाकरे बंधूंनी एकीची वज्रमूठ आवळत हिंदीसक्तीविरोधात एल्गार पुकारलाय. मात्र राज्यात हिंदीसक्ती नसून मराठी सक्ती असल्याचा दावा भाजपच्या नेत्यांकडून केला जातोय. खरंतर अशोक उईकेंनी आपण आदिवासी समाजातून येत असल्याने आपल्याला हिंदी येत नाही, असं म्हटलंय.. मात्र भाजपच्या मंत्र्यांना खरंच हिंदी येत नाही की मराठी मतदारांच्या रोषाला सामोरं जावं लागू शकतं, म्हणून घेतलेला धसका? याचीच चर्चा रंगलीय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com