Maharashtra Politics: भाजपमध्ये इनकमिंग, मित्रपक्षांना धसका,भाजपकडून मित्रपक्षांवर दबावतंत्र?

BJP allies fear internal competition: भाजपमधील इनकमिंगमुळे मित्र पक्ष चांगलेच धास्तावलेत... कारण भाजपने मित्रपक्षांचीच कोंडी सुरु केलीय.. त्यामुळे मेगाभरती फायद्याची की तोट्याची ठरणार?
BJP’s growing list of new entrants includes rivals of their own Mahayuti partners, stirring internal tension ahead of future elections
BJP’s growing list of new entrants includes rivals of their own Mahayuti partners, stirring internal tension ahead of future electionsSaam Tv
Published On

राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी पक्षप्रवेशाचा झपाटाच लावलाय.. भाजपने शिंदे सेना आणि अजित पवारांचे आमदारांचे पारंपरिक विरोधक पक्षात घेत मित्रपक्षांचीच कोंडी केलीय....त्यातच काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर शिंदे सेनेने शेलक्या शब्दात गोरंट्याल यांच्यावर निशाणा साधलाय...

विधानसभा निवडणुकीत 132 आमदार निवडून आल्यानंतर भाजपने 2029 ची तयारी सुरु केलीय.. त्यासाठी भाजपने शिंदे सेना आणि अजित पवारांचे आमदार असलेल्या मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरु केलीय...

भोर-मुळशी-वेल्हा

राष्ट्रवादीचे शंकर मांडेकरांचे विरोधक संग्राम थोपटेंचा भाजपमध्ये प्रवेश

पाटण

शंभुराज देसाईंचे विरोधक सत्यजित सिंह पाटणकर भाजपात

इंदापूर

दत्ता भरणेंचे विरोधक उद्योजक प्रवीण मानेंच्या हाती कमळ

रायगड

शिंदे सेनेचे विरोधक पंडित पाटील यांचा भाजपात प्रवेश

पुरंदर

शिंदे सेनेचे आमदार विजय शिवतारेंचे पारंपरिक विरोधक संजय जगताप भाजपात

भाजपमध्ये खोऱ्याने होत असलेल्या या पक्षप्रवेश म्हणजे सत्तेची हाव असल्याचा टोला विरोधकांनी लगावलाय...

भाजपचे नेते शतप्रतिशत भाजप हा नारा देतोय.. त्यामुळेच भाजपमध्ये पक्षप्रवेशाच्या रांगा लागल्या आहेत... मात्र ही मेगाभरती महाविकास आघाडीला धक्का देणारी आहे की भाजप आणि महायुतीच्या नेत्यांच्या वर्चस्वाला धक्का देणारी? हे भविष्यात कळेलच.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com