- विनायक वंजारे
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या (sindhudurg dcc bank) स्विकृत संचालकपदी आज (शुक्रवार) आमदार नितेश राणे (nitesh rane) यांची वर्णी लागलेली आहे. जिल्हा बँक अध्यक्ष पदावर संतोष परब (santosh parab) हल्ला प्रकरणात नाव आलेले नितेश राणेंचे समर्थक मनिष दळवी (manish dalvi) यांची निवड करण्यात आली होती. (nitesh rane latest marathi news)
येथे मोठी प्रतिष्ठेची झालेली सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या (sindhudurg dcc bank) निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीच्या पॅनेलचा धुव्वा उडवत निर्विवाद बाजी मारली होती. दरम्यान स्वीकृत संचालक पदासाठी आमदार नितेश राणे (nitesh rane) यांचे नाव केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांच्याकडून निश्चित करण्यात आले होते. आज जिल्हा बँकेच्या स्वीकृत संचालक पदी नितेश राणेंची निवड करण्यात आली.
दोन महिन्यांपुर्वी आमदार नितेश राणे यांची थकबाकी असल्याचे कारण देत बँक निवडणुकीत मतदार यादीतून त्यांचे नाव वगळण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा बँकेचे मतदार असलेले संतोष परब हल्ला प्रकरणातील सूत्रधार म्हणून आमदार नितेश राणेंचे नाव आल्यामुळे ही निवडणूक चांगलीच गाजली होती. मात्र आमदार नितेश राणे या संपूर्ण निवडणुकीत किंग मेकरच्या भूमिकेत होते आणि आता आमदार नितेश राणे स्वतः जिल्हा बँकेत स्वीकृत संचालकपदी निवड झाल्यामुळे जिल्हा बँकेच्या वर्तुळात एक वेगळे ट्विस्ट निर्माण झाले आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.