औरंगाबादमध्ये आज भाजपचा 'जल आक्रोश मोर्चा'

औरंगाबाद शहरात आठ-आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
Aurangabad News
Aurangabad NewsSaam Tv
Published On

औरंगाबाद - शहरातील पाणीप्रश्नावर आज सायंकाळी साडे चार वाजता भाजपकडून जल आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करणार आहेत. सायंकाळी औरंगाबाद (Aurangabad) शहरातील पैठणगेटहून महापालिकेवर हा मोर्चा निघणार आहे. औरंगाबाद शहरात आठ-आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. चालू उन्हाळ्यात भाजपकडून वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्यात आली. मात्र, पाणीपुरवठा सुरळीत झालं असल्याचा भाजपचा आरोप आहे.

हे देखील पाहा -

1972 साली टाकण्यात आलेली जायकवाडी ते औरंगाबाद ही पाईपलाईन जीर्ण झाल्याने अनेक ठिकाणी फुटते. पूर्ण क्षमतेने पाणी शहरात येत नाही. त्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना 1680 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. मात्र, महाविकास आघाडी सरकारने नव्याने अध्यादेश काढून योजनेचे स्वरूप बदलल्याने त्या योजनेचे काम अद्याप वेगाने होत नसल्याचंही भाजपचं म्हणणं आहे.

निवडणुकीच्या तोंडावर सध्या संभाजीनगर, पाणी प्रश्न आणि औरंगजेबची कबर यावरून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात शहरातील पाण्याचा प्रश्न हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा असल्यामुळे हा मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चाला १४ अटींसह परवानगी दिली आहे. पैठण गेट ते गुलमंडी मार्गे महात्मा फुले चौक मार्गे सांस्कृतिक मंडळ ते महापालिका असा मोर्चा काढण्याची पोलिसांनी परवानगी दिली आहे. महापालिकेच्या समोरच सभेनंतर समारोप होणार आहे.

कसा आहे मोर्चाचा मार्ग ..

- पैठण गेट वरून मोर्चाला सुरुवात होईल. त्यानंतर गुलमंडी, औरंगपुरा आणि सरळ खडकेश्वर मंदिरापर्यंत मोर्चा जाईल.

- खडकेश्वर मंदिरापासून मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान मार्गे महापालिकेकडे मोर्चा जाईल

वाहतूकित कोणता बदल करण्यात आलाय ते पाहूयात..

ज्या मार्गातून मोर्चा काढण्यात येणार आहे, तो मार्ग दुपारी 4 वाजून 45 मिनिटांपासुन सायंकाळी 7 वाजेपर्यंत वाहनांसाठी बंद करण्यात येत आहे. त्यात

१) सिल्लीखाना चौक, पैठणगेट ते बाराभाई ताजीया चौक

२) बाराभाई ताजीया चौक मच्छली खडक सिटीचौक पोलीस ठाणे,

३) सिटी चौक पोलीस ठाणे, जुने पोस्ट ऑफीस ते महानगरपालिका

हे मार्ग बंद असतील.

त्यासाठी पर्यायी मार्ग

१) पैठणगेट कडे जाणारी व येणारी वाहतुक ही सिल्लीखाना चौक कडून बीएसएनएल चौक चौक मार्ग जातील व येतील.

२) महात्मा फुले चौकाकडून येणारी वाहतुक ही सावरकर चौक मार्ग जातील व येतील

३) पोलीस स्टेशन सिटी चौकाकडे येणारी वाहतुक ही कामाक्षी लॉज चेलीपुरा मार्ग जातील.

ही अधिसुचना पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल व अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना लागु राहणार नाही.

Aurangabad News
मसाल्याच्या राणीचा आरोग्यासाठी असाही फायदा!

भाजपच्या जल आक्रोश मोर्चाला पोलिसांनी 14 अटींसह परवानगी दिली

1) मोर्चेकऱ्यांनी स्वयंशिस्त पाळणे आवश्यक आहे.

2) मोर्चादरम्यान तलवार, स्पोटक पदार्थ आणू नयेत.

3) मोर्चाला येणाऱ्या लोकांची संख्या एक दिवस आधी संबंधित पोलिस स्टेशनला कळवावी.

4) क्षमतेपेक्षा जास्त लोक आल्यास आणि ढकलाढकली किंवा इतर काही अनुचित प्रकार घडल्यास आयोजकांना जबाबदार धरले जाईल.

5) आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करू नये.

6) मोर्चाच्या स्वयम् शिस्तीसाठी स्वयंसेवक नेमले जावेत.

5) मोर्चादरम्यान जात, वंश, धर्म, वर्ण प्रदेश व्यक्ती याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करू नये.

6) ध्वनीक्षेपकाचाची मर्यादा पाळावी.

7) पोलिसांनी आखून दिलेल्या रूटने चा मोर्चा काढण्यात यावा. यासह चौदा अटींवर परवानगी दिली आहे.

पाणी प्रश्नावरून भाजप आक्रमक का?

- औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्नावरून भाजपकडून सिडको, हडकोमध्ये आंदोलने करण्यात आली; तरीही पाण्याचा पुरवठा सुरळीत झाला नसल्याचा भाजपचा आरोप

- शिवसेना 30 वर्षांपासून सत्तेत असताना पाणीप्रश्न सोडवला नसल्याचा सर्वपक्षीय नेत्यांचा आरोप

- तत्कालीन फडणवीस सरकारने 2019 मध्ये 1680 कोटीची योजना मंजूर करूनही त्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही, अत्यंत संथ असल्याचा भाजपचा आरोप

- महापालिका निवडणुकीसाठी संभाजीनगर आणि पाणीप्रश्न अनेक वर्षांपासून मुद्दा; त्याच मुद्द्यावर शिवसेनेची अडचण निर्माण करण्यासाठी विरोधी पक्ष सरसावले

- औरंगाबादसाठी समांतर जलवाहिनी योजना शिवसेनेमुळे पूर्ण होऊ शकली नसल्याचा सातत्याने आरोप; 15 वर्षांपूर्वी केंद्र सरकारने ही योजना जाहीर केली होती. पण कॉस्ट वाढल्यानं ती पूर्ण झाली नाही.

- आता भाजप - शिवसेनेत पाणीप्रश्नावरून एकमेकांकडे बोट दाखवणे सुरू आहे.

- पोस्टर वॉर, सोशल मीडिया वॉर सुरू आहे. कुठं पोस्टर फाडाफाडी तर एकमेकांवर आरोपही सुरू आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com