कुणाच्या पाटीत खंजीर खुपसल्यावर सत्तेत येऊ, एवढाच विचार पवारांनी करावा - पडळकर

चार राज्यात भाजपने सत्ता मिळवली आहे. त्यामुळे आपण काय करतो याचा विचार करावा भाजपच्या आमदारांचा करू नये.
Sharad Pawar
Sharad PawarSaam TV
Published On

सांगली : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार (MVA Goverment) येईल असं वक्तव्य शरद पवार (Sharad Pawar) आणि त्यांचे नेते करत आहेत. पण त्यांनी भाजपच्या आमदारांचा विचार करू नये. त्यांनी एकच विचार करावा कुणाच्या पाटीत खंजीर खुपसल्यावर आपण सत्तेत येईल याचा विचार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी करावा. अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे ते सांगली मध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

राष्ट्रवादीचे (NCP) नेते वारंवार सांगतात महाविकास आघाडी पुढचे 25 वर्ष सत्तेत येईल असे सांगत आहेत. पण त्यांनी लक्षात घ्यावे की देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आले आहेत. चार राज्यात भाजपने सत्ता मिळवली आहे. त्यामुळे त्यांनी आपण काय करतो याचा विचार करावा भाजपच्या आमदारांचा करू नये.

Sharad Pawar
महाविकास आघाडीत २५ आमदार नाराज, निवडणूका लागताच भाजपात येणार; केंद्रीय मंत्र्यांच वक्तव्य

सांगली जिल्हा बँक (Sangli District Bank) ही शेतकऱ्यांची बँक आहे. जर त्या बँकेत स्वतःच्या स्वार्थासाठी नेत्याचा विचार करून कर्ज दिली जात असतील आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत असतील तर यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा पडळकर यांनी दिला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com