जालना : राज्यातील महाविकास आघाडी (MVA) सरकारमधील २५ आमदार आमच्या संपर्कात असून ते निवडणूका आल्या की भाजपमध्ये (BJP) प्रवेश करतील. असा खळबळजनक दावा भाजपचे वरिष्ठ नेते, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) यांनी केलाय. ते आज कुटुंबीयांसोबत भोकरदन येथे होळी साजरी करत होते. यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.
ते म्हणाले, सत्ताधारी पक्षांचे २५ आमदार मविआ सरकार (MVA Goverment) मध्ये नाराज असून ते आताच्या विधीमंडळ अधिवेशनावर बहिष्कार देखील टाकणार होते. मात्र त्यांची त्यांच्या पक्षनेत्यांनी समजूत घातली आहे. मात्र, त्यांच्या नेत्यांनी आता त्यांची समजूत काढली असली तरीही हे नाराज असलेले २५ आमदार निवडणूक आली की हे नाराज आमदार भाजपच्या वाघोरीत येऊन पडतील असं दानवे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यांने राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ माजली असून ते २५ कोण अशी चर्चा देखील सुरु झाली आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.