Akola Politics: भाजपची डोकेदुखी वाढली, अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली, नेमकं काय घडलं?

Vanchit Bahujan Aghadi Alliance: तेल्हारा नगरपरिषदेत वंचित बहुजन आघाडी, शेतकरी पॅनल आणि विकास मंच युतीनंतर राजकीय समीकरण बदलले.
Vanchit Bahujan Aghadi forms alliance with Farmer Panel and Vikas Manch in Telhara, altering Akola’s municipal election dynamics. BJP and Congress yet to announce their candidates.
Vanchit Bahujan Aghadi forms alliance with Farmer Panel and Vikas Manch in Telhara, altering Akola’s municipal election dynamics. BJP and Congress yet to announce their candidates.Saam Tv
Published On
Summary

तेल्हारा नगरपरिषदेत वंचित बहुजन आघाडी, शेतकरी पॅनल आणि विकास मंच युतीने राजकीय समीकरण पालटलं.

वंचितने चार नगराध्यक्ष पदांसाठी उमेदवार जाहीर केले.

भाजप आणि काँग्रेसकडून उमेदवार जाहीर व्हायचे बाकी.

अकोल्यातील निवडणुकीत स्थानिक पक्षांच्या ताकदीमुळे मोठा राजकीय संघर्ष अपेक्षित

अक्षय गवळी, साम टीव्ही

अकोला जिल्ह्यातील पाच नगरपरिषद आणि एका नगरपंचायतीसाठी निवडणूक होतं आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडी पक्षाने चार नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार जाहीर केले होते. त्यातल्या तेल्हारा नगरपालिकेत वंचितला दोन स्थानिक संघटनेने पाठिंबा दिलाय. त्यामुळं राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे.

Vanchit Bahujan Aghadi forms alliance with Farmer Panel and Vikas Manch in Telhara, altering Akola’s municipal election dynamics. BJP and Congress yet to announce their candidates.
कोकणात महायुतीत वादाची ठिणगी, शिवसेनेविरोधात भाजप आक्रमक; माजी आमदारासह ३९ पदाधिकाऱ्यांचा राजीनाम्याचा इशारा

दरम्यान, तेल्हारा नगरपरिषदसाठी वंचित बहुजन आघाडीची शेतकरी पॅनल आणि तेल्हारा विकासमंच सोबत युतीची घोषणा झालीय. वंचित बहुजन आघाडी जिल्हा समन्वय एड‌ नतिकउद्दीन खतीब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये करण्यात आली. या बैठकीला जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे ज्ञानेश्वर सुलताने, तालुकाध्यक्ष अशोक दारोकार तर शेतकरी पॅनलचे राजेश खारोडे, सुनील खारोडे, प्रदीप सोनटक्के, तर तेलारा विकास मंचचे कैलास ढोकणे रामा फाटकरसह किशोर जामनिकसह आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Vanchit Bahujan Aghadi forms alliance with Farmer Panel and Vikas Manch in Telhara, altering Akola’s municipal election dynamics. BJP and Congress yet to announce their candidates.
महायुतीत पुन्हा एकदा बिघाडी! भाजप-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत क्षुल्लक कारणावरुन वाद

या युतीमुळे तेल्हारा शहरात होत असलेल्या नगरपालिका निवडणुकीचे चित्र बदलले आहे. मात्र, या ठिकाणी अद्याप पर्यंत काँग्रेस आणि भाजपने आपला उमेदवार घोषित केला नसून महाविकास आघाडी एकत्रित जिल्ह्यातील निवडणूक लढण्याचे संकेत आहेत. तर महायुतीत एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकला चलो रे चा नारा देण्याची शक्यता आहे.

Vanchit Bahujan Aghadi forms alliance with Farmer Panel and Vikas Manch in Telhara, altering Akola’s municipal election dynamics. BJP and Congress yet to announce their candidates.
मंत्र्यांकडूनच मतदार यादीत घोळ; अंबादास दानवेंचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

आतापर्यंत वंचितकडून 4 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार घोषित..

दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे अकोला जिल्ह्यातील सहापैकी नगराध्यक्षपदाचे 4 उमेदवार जाहीर झाले आहे. घोषित केलेल्या चारपैकी दोन ठिकाणी मुस्लिमांना संधी देण्यात आली. यात एका नगर पंचायत आणि 3 नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर करण्यात आलेत. यामध्ये बार्शीटाकळी नगरपंचायत आणि मूर्तिजापूर, आकोट आणि तेल्हारा नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्ष उमेदवार जाहीर केले होते. तर उर्वरित बाळापुर आणि हिरवखेड या ठिकाणी वंचितकडून नगराध्यक्ष उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोतर्ब बाकी होणं बाकी आहे. मात्र, या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी कडून स्थानिक संघटनेला सोबत घेत युती होण्याची शक्यता आहे.

Vanchit Bahujan Aghadi forms alliance with Farmer Panel and Vikas Manch in Telhara, altering Akola’s municipal election dynamics. BJP and Congress yet to announce their candidates.
Manoj Jarange: दादांनी आता संभाळून राहावं; धनंजय मुंडेंवरून जरांगे पाटील यांचा अजित पवारांना इशारा

नेमकं कोण आहे वंचितकडून उमेदवार..

नगरपालिका : उमेदवार नावे.

1) बार्शीटाकळी नगरपंचायत - अख्तर खातून अलिमोद्दीन.

2) मूर्तिजापूर नगरपरिषद - शेख इम्रान शेख खलील.

3) अकोट नगरपरिषद - स्वाती मंगेश चिखले

4) तेल्हारा नगरपरिषद - विद्या सिद्धार्थ शामस्कार.

तेल्हारा नगरपालिका अंतिम पक्षीय बलाबल :

एकूण जागा : 17

भाजप : 05

शेतकरी आघाडी : 05

प्रहार आघाडी : 02

शहरविकास आघाडी : 01

काँग्रेस-राष्ट्रवादी : 02

नगरसेवा समिती : 02

तेल्हाऱ्यात कुणाची लागली प्रतिष्ठा पणाला.

तेल्हारा नगरपालिका निवडणुकीमध्ये विद्यमान भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे, काँग्रेस महेश गणगणे, वंचितचे प्रमोद देंडवे, उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार संजय गावंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com