Uddhav Thackeray news
Uddhav ThackeraySaam Tv

भाजपला शिवसेना ठाकरे गटाकडून धक्का! २ बड्या नेत्यांसह २९ जणांनी कमळाची साथ सोडली

Nagar Parishad Elections Heat Up: धाराशिवमध्ये नगरपरिषद निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का. २ माजी नगरसेवकांसह २९ कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला.
Published on

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर करणाऱ्या नेत्यांची संख्या वाढताना दिसत आहे. महायुती आणि महाआघाडीतील नेत्यांनी कंबर कसली आहे. अशातच धाराशिवमध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपला झटका बसला आहे. दोन माजी नगरसेवकांसह २९ कार्यकर्त्यांनी भाजपमधून शिवसेना ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला आहे.

धाराशिवमध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. भाजपच्या दोन माजी नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्यासह २९ कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन माजी नगरसेवकांसह २९ कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

Uddhav Thackeray news
'लग्नाच्या १० महिन्यांत १० दिवसही खूश नाही, मी आयुष्य..' VIDEO तयार करून विवाहितेनं आयुष्य संपवलं, कारण ऐकून धक्काच बसेल

धाराशिवचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर हा भाजपला धक्का मानला जात आहे. या प्रवेशामुळे धाराशिवमध्ये शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढल्याचे स्पष्ट झाले असून, आगामी निवडणुकीत ठाकरे गटाला याचा फायदा होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Uddhav Thackeray news
बलात्काराचा आरोप असलेल्या पोलिसाकडून आत्मसमर्पण; डॉक्टर तरूणी आत्महत्या प्रकरणात बदने नेमकं काय म्हणाले?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com