विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी BJPकडून संजय केनेकर यांची उमेदवारी निश्चित

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाच्या कोअर कमिटीच्या सदस्यांशी चर्चा करून संजय केनेकर यांचे नाव भाजपा, महाराष्ट्रतर्फे निश्चित केले आहे.
संजय केनेकर
संजय केनेकरSaamTV

सुशांत सावंत -

मुंबई : विधान परिषदेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे (BJP) पक्षाचे औरंगाबाद शहर जिल्हाध्यक्ष संजय केनेकर (Aurangabad City District President Sanjay Kenekar) यांना उमेदवारी द्यावी, अशी शिफारस प्रदेश भाजपातर्फे पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीला करण्यात आली आहे. (BJP confirms Sanjay Kenekar's candidature for Legislative Council by-election)

हे देखील पहा -

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासह पक्षाच्या कोअर कमिटीच्या सदस्यांशी चर्चा करून संजय केनेकर यांचे नाव भाजपा, महाराष्ट्रतर्फे निश्चित केले आणि तशी शिफारस केली असल्याची माहिती समोर येत आहे.

संजय केनेकर
"फडणवीस लेखी माफी मागा" निलोफर मलिक-खान यांची फडणवीसांना अब्रू नुकसानीची नोटीस

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा (BJP national president Jagat Prakash Nadda) यांच्या अनुमतीने केंद्रीय निवडणूक समितीकडून मा. संजय केनेकर यांची उमेदवारी लवकरच निश्चित होण्याची अपेक्षा आहे. निवडणूक अर्ज भरण्याची मुदत 16 नोव्हेंबर असून केंद्रीय समितीकडून नाव निश्चित झाल्यावर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत लवकरच अर्ज दाखल करण्यात येईल. भारतीय जनता पार्टी विधानसभा सदस्यांमार्फत होणारी ही निवडणूक पूर्ण सामर्थ्यानिशी लढेल आणि जिंकेल, असा विश्वास चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com