"फडणवीस लेखी माफी मागा" निलोफर मलिक-खान यांची फडणवीसांना अब्रू नुकसानीची नोटीस

आर्यन खान ड्रग्स प्रकरणापासून सुरु झालेलं हे राजकारण आता फडणवीस विरुद्ध मलिक असं झालंय. यात दोन्ही नेत्यांचे कुटुंबियही ओढले गेले आहेत.
"फडणवीस लेखी माफी मागा" निलोफर मलिक-खान यांची फडणवीसांना अब्रू नुकसानीची नोटीस
"फडणवीस लेखी माफी मागा" निलोफर मलिक-खान यांची फडणवीसांना अब्रू नुकसानीची नोटीसSaam Tv
Published On

रश्मी पुराणिक, मुंबई

मुंबई: गेल्या महिन्याभरापासून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) हे भाजपवर सातत्याने टीका करतायत. आरोप-प्रत्योरोपांच्या या वादात आता फडणवीस आणि मलिकांच्या कुटुंबीयांनीही उडी घेतली आहे. नवाब मलिकांचे जावई समीर खान (Sameer Khan Drugs Case) यांच्या घरात ड्रग्स सापडल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. हे आरोप फेटाळून लावत नवाब मलिकांची मुलगी निलोफर मलिक-खान (Nilofer Malik - Khan) यांनी देवेंद्र फडणवीसांना आता कायदेशीर नोटीस पाठवली आहे. फडणवीसांचा आरोप चुकीचा असल्याचा दावा करत निलोफर यांनी फडणवीस यांच्या विरोधात अब्रू नुकसानीची नोटीस काढली आहे. (Nawab malik daughter Nilofer Malik-Khan issues defamation notice to devendra Fadnavis)

हे देखील पहा -

एनसीबीने नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्स प्रकरणी अटक केली होती. समीर खान यांच्या घरात ड्रग्स आढळून आले असे आरोप फडणवीसांनी केले होते. हे आरोप नवाब मलिकांसह त्यांच्या कुटुंबियांनीही फेटाळून लावले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक हे सातत्याने पत्रकार परिषद घेऊन भाजपवर आरोप करतायत. त्यांनी देवेंद्र फडणवीसांना चक्क ड्रग्स माफियांचे मास्टरमाईंट म्हटले होते. त्यामुळे फडणवीसांसह त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही मलिकांवर सातत्याने टीका केली आहे.

"फडणवीस लेखी माफी मागा" निलोफर मलिक-खान यांची फडणवीसांना अब्रू नुकसानीची नोटीस
Elections 2022: मुंबईत प्रभाग वाढणार... पण कुठे? पालिकेचं ठरलंय!

एकुणच आर्यन खान ड्रग्स प्रकरणापासून सुरु झालेलं हे राजकारण आता फडणवीस विरुद्ध मलिक असं झालंय. यात दोन्ही नेत्यांचे कुटुंबियही ओढले गेले आहेत. अमृता फडणवीस अनेकदा ट्विटरवरुन राजकीय वक्तव्य करत होत्या. आता त्याला प्रत्युत्तर म्हणून नवाब मलिकांच्या दोन्ही कन्या निलोफर मलिक-खान आणि सना मलिक-शेख हे देखील आता राजकीय वक्तव्य करु लागले आहेत. निलोफर मलिक यांना थेट कायदेशी नोटीस पाठवल्याने मलिक-फडणवीस वाद आणखी चिघळला जाण्याची शक्यता आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com