Nashik Politics : नाशिकच्या जागेवरुन भाजप-शिवसेनेत संघर्ष; हेमंत गोडसेंच्या शक्तीप्रदर्शनानंतर भाजप आक्रमक

Loksabha Election 2024 : हेमंत गोडसे सध्या शिवसेनेचे खासदार तिथे आहेत. मात्र त्यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी असल्याचं कारण देत भाजपने या जागेवर दावा केला आहे.
NAshik NEws
NAshik NEws Saam Tv
Published On

Nashik News :

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन महायुतीत अजून रस्सीखेच सुरु असल्याचं दिसून येत आहे. एकीकडे भाजपने २३ उमेदवारांची नावं घोषित केली आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अजूनही प्रतीक्षेत आहे. अनेक जागांचा तिढा न सुटल्याने नावाची घोषणा होण्यास उशीर होत असल्याचं बोललं जात आहे. नाशिकच्या जागेचाही त्यात समावेश आहे.

नाशिक लोकसभेची जागेवर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) असे तिन्ही पक्ष दावा करत आहेत. हेमंत गोडसे सध्या शिवसेनेचे खासदार तिथे आहेत. मात्र त्यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी असल्याचं कारण देत भाजपने या जागेवर दावा केला आहे. (Maharashtra Loksabha Election 2024)

NAshik NEws
Shrikant Shinde : उद्धव ठाकरेंना जाब विचारण्याची हिंमत कुठून येईल? श्रीकांत शिंदेंची टीका

मात्र नाशिकची जागा शिवसेना शिंदे गटालाच मिळेल. नाशिकचा मतदारसंघ पारंपरिक शिवसेनेचा आहे. अन्य पक्ष नाशिकच्या जागेवर दावा करत असल्यानं शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. नाशिकच्या जागेवर मित्र पक्ष दावा करत असल्यानं आमच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचण्यासाठी काल मुख्यमंत्र्यांना भेटलो, असं हेमंत गोडसे यांनी सांगितलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नाशिकच्या जागेचा निर्णय महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत होईल. छगन भुजबळ यांनी जरी नाशिकची जागा मागितली असली तरी जागा शिवसेनेलाच मिळेल. उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपचे नेते एकदिलाने मदत करतील, असा विश्वास खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला.

NAshik NEws
Maharashtra Lok Saba Eelection : सातारा लोकसभा मतदारसंघ आमचा, त्यावर आम्ही ठाम; प्रफुल्ल पटेल यांची माहिती

नाशिकच्या जागेवरून भाजप-शिवसेना वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे. कारण हेमंत गोडसे यांच्या शक्तिप्रदर्शनानंतर भाजपने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. नाशिकचे भाजप आमदार आणि पदाधिकारी मुंबईकडे रवाना झाले आहे. (Latest Marathi News)

नाशिकच्या जागेसंदर्भात देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत. शहरातील सर्व आमदार आणि प्रमुख पदाधिकारी नाशिकच्या जागेसाठी आग्रही आहेत. नाशिकमध्ये भाजपची ताकत जास्त असल्यानं नाशिकची जागा भाजपला मिळाली पाहिजे, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com