Maharashtra Lok Saba Eelection : सातारा लोकसभा मतदारसंघ आमचा, त्यावर आम्ही ठाम; प्रफुल्ल पटेल यांची माहिती

Maharashtra Political News : आम्ही राज्यातील लोकसभेच्या ७ जागांवर अडून आहोत. सातारा लोकसभा मतदारसंघ आमचा आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
Praful Patel
Praful PatelSaam Tv
Published On

रुपाली बडवे, मुंबई

Praful patel News :

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. महायुतीच्या लोकसभेच्या जागावाटपावर अद्याप तोडगा निघाला नसल्याची माहिती हाती येत आहे. याचदरम्यान, काल दिल्लीत सातारा लोकसभा मतदारसंघातून लढण्याची इच्छा उदयनराजे भोसले यांनी भाजपच्या वरिष्ठांकडे व्यक्त केली. त्यानंतर साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या सर्व घडामोडीनंतर आम्ही राज्यातील लोकसभेच्या ७ जागांवर अडून आहोत. सातारा लोकसभा मतदारसंघ आमचा आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली. (Latest Marathi News)

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी महायुतीचे नेते दिल्लीला पोहोचले. बैठकीनंतर रात्री उशिरा घरी पोहोचले. तर सातारा लोकसभा मतदारसंघातून लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उदयनराजे भोसले यांनी काल दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली.

उदयनराजे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जवळपास ३० मिनिटे चर्चा केली. या भेटीनंतर उदयनराजे भोसले यांच्या साताऱ्यातील उमेदवारीवर शिक्कामोर्तब असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दिल्लीत महायुतीची चर्चा झाल्यानंतर आज रविवारी अजित पवार गटाची चर्चा झाली.

Praful Patel
Maharashtra Loksabha : प्रहार जनशक्ती महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता; ६ एप्रिलला करणार उमेदवाराची घोषणा

अजित पवार गटाच्या बैठकीत जागावाटपावर अद्याप तोडगा निघाला नाही. या बैठकीत अजित पवार गटाने सातारा लोकसभा मतदारसंघावर दावा केला. अजित पवार गट महायुतीत ७ जागांसाठी आग्रही आहे. तसेच साताऱ्याची जागा न सोडण्याची अजित पवार गटाची राहणार आहे.

Praful Patel
Vijay Shivtare News: ठरलं! बारामती लोकसभा अपक्ष लढवणार; विजय शिवतारेंची मोठी घोषणा

महायुतीतील जागावाटपावर अजित पवार गटाची भूमिका स्पष्ट करताना प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे की, 'आम्ही लोकसभेच्या ७ जागांवर अडून आहोत. आम्ही ७ जागांच्या खाली निवडणूक लढवणार नाही. सातारा लोकसभा मतदारसंघ हा आमचा आहे. त्यावर आम्ही ठाम आहोत. तो दावा आम्ही सोडला नाही. बारामती,शिरूर,रायगड,सातारा,धाराशिव,परभणी आणि गडचिरोली या मतदारसंघावर आमचा दावा आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com