भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत तुफान हाणामारी; घटनेनंतर संपूर्ण नगरपरिषद सील

Clash Between BJP and Shinde-Led Shiv Sena in Akola ; अकोला जिल्ह्यातील हिवरखेड नगरपरिषदेत भाजप आणि शिंदे गटाच्या नगरसेवकांमध्ये तुफान हाणामारी झाली. परस्परविरोधी गुन्हे दाखल झाल्यानंतर CCTV फुटेज हस्तगत करण्यासाठी संपूर्ण नगरपरिषद सील करण्यात आली आहे.
Clash Between BJP and Shinde-Led Shiv Sena in Akola
Clash Between BJP and Shinde-Led Shiv Sena in Akola
Published On

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

BJP and Shinde Sena clash at Hiwarkhed Municipal Council : अकोला जिल्ह्यातील हिवरखेड नगरपरिषदेत २७ नोव्हेंबर रोजी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत झालेल्या तुफान राड्यानंतर आता संपूर्ण नगरपरिषद सील करण्यात आली आहे. सर्वसाधारण सभेच्या कार्यक्रम पत्रिकेसोबत विषयांची सविस्तर टिपणी न दिल्याच्या कारणावरून भाजप आणि शिंदे गटाच्या नगरसेवकांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. हा राडा सभागृहाच्या आत आणि बाहेर अशा दोन्ही ठिकाणी घडला. या प्रकरणी दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून पोलिसांनी गुन्हे नोंदवले आहेत.

हिवरखेड नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत कार्यक्रम पत्रिकेसोबत विषयांची सविस्तर माहिती देणारी टिपणी का देण्यात आली नाही, यावरून वादाची ठिणगी पडली. पाहता पाहता भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचे नगरसेवक एकमेकांना भिडले आणि त्यांच्यात तुफान हाणामारी झाली. सभागृहाबाहेरही दोन्ही गट आमनेसामने आले होते.

या मारहाणीत शिवसेनेचे नगरसेवक तथा गटनेते रवी घुंगड आणि नगरसेवक ऋषी पंचबुद्धे यांना मारहाण झाल्याचा आरोप आहे. ही मारहाण नगराध्यक्षांच्या नातेवाईकांनी केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, दोन्ही बाजूंनी परस्पर आरोप-प्रत्यारोप होत असल्याने CCTV फुटेज तपासल्यानंतरच नेमकी वस्तुस्थिती समोर येण्याची शक्यता आहे.

Clash Between BJP and Shinde-Led Shiv Sena in Akola
भाजप अन् शिंदेसेनेचे नगरसवेक आपापसांत भिडले; दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये कपडे फाटेस्तोवर हाणामारी

या राड्यानंतर दोन्ही गटांच्या नगरसेवकांनी व कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या असून पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये भाजपच्या नगराध्यक्ष सुलभा दुतोंडे यांचे पती रमेश दुतोंडे व त्यांच्या दोन मुलांसह एकूण नऊ जणांचा समावेश आहे. दरम्यान, या घटनेतील सत्य समोर आणण्यासाठी नगरपरिषदेतील CCTV फुटेज हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे. त्यामुळे पोलीस व नगरपरिषद प्रशासनाकडून CCTV फुटेज हस्तगत करेपर्यंत संपूर्ण हिवरखेड नगरपरिषद सील करण्यात आली आहे. तसेच सुरक्षेचा उपाय म्हणून नगरपरिषद परिसरात दोन पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com