नंदूरबारच्या नवापूरमधील परिसरात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. यामुळे प्रशासन सतर्क झालं असून मोठ्या प्रमाणात कोंबड्यांना मारण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यासाठी तालुक्यामधील तीन पोल्ट्री फार्ममझील नमुने घेण्यात आले होते. हे नमुने इंदूरच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत. दरम्यान या तिन्ही नमुन्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर प्रशासनाने कारवाई सुरु केलीये.
दरम्यान बर्ल्ड फ्लू सारख्या आजाराचा धोका लक्षात घेता प्रशासनाने तालुकास्तरीय समिती स्थापन केलीये. या समितीमार्फत नवापूर परिसरातील सर्व पोल्ट्री फार्मची तपासणी करण्यात येणार आहे. या ठिकाणचे नमुने घेण्याची प्रक्रिया देखील सुरु करण्यत आली आहे. तर ज्या पोल्ट्री फार्ममधील नमुने पॉझिटीव्ह आले आहेत त्या ठिकाणच्या एक किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्यांना मारण्यात येणार आहे.
दरम्यान बर्ड फ्लूचा फैलाव होऊ नये यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून तीन किलोमीटर परिसर कंटेनमेंट झोन आणि पाच किलोमीटर परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. या भागात विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
याशिवाय, पोल्ट्री फार्म चालकांनी नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. ज्या पोल्ट्री फार्मचं नुकसान होणार आहे त्यांच्या नुकसानीची माहिती शासनाकडे पाठवून नियमानुसार मदत देण्यात येणार असल्याचंही प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.