Bird Flu: उदगीरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, प्रशासनाकडून कोंबडी आणि अंडी नष्ट

Latur Udgir Bird Flu: लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे बॉयलर कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. शहरात या आजाराचा शिरकाव झाल्याने प्रशासन सतर्क झाले असून, आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय त्वरित अमलात आणले जात आहेत.
Bird Flu
Bird Flusaam tv
Published On

लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे बॉयलर कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्याचे समोर आले आहे. शहरात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने प्रशासन सतर्क झाले असून, आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. उदगीर येथील काही पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाल येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. नुकत्याच प्राप्त झालेल्या अहवालानुसार या नमुन्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या भागातील बाधित कोंबड्या आणि त्यांच्या अंड्यांचे सुरक्षितपणे नष्टिकरण करण्याची प्रक्रिया प्रशासनाने तातडीने हाती घेतली आहे.

यासोबतच, पुढील संसर्ग रोखण्यासाठी पोल्ट्री फार्म आणि परिसराची स्वच्छता तसेच निर्जंतुकीकरण करण्याचे आदेशही दिले गेले आहेत. प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाता, आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सार्वजनिक ठिकाणी मृत पक्षी आढळल्यास त्वरित स्थानिक प्रशासनाला माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Bird Flu
Maharashtra Weather: राज्याच्या हवामानात चढ-उतार; राज्यभर रात्री-पहाटे थंडी, दिवसा उकाडा

बर्ड फ्लूच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन स्थानिक पोल्ट्री व्यावसायिकांना त्यांच्या फार्मची स्वच्छता आणि सुरक्षिततेची खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, नागरिकांनी योग्य प्रकारे शिजवलेले मांस आणि अंडी सेवन करण्याच्या सल्ल्याचे पालन करावे, असेही प्रशासनाकडून सुचवण्यात आले आहे.

उदगीरमध्ये बर्ड फ्लू आढळल्याने स्थानिक नागरिकांमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले असले, तरीही प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली असून परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत मार्गदर्शनानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना अमलात आणाव्यात, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Bird Flu
Pimpri-Chinchwad: पिंपरी चिंचवड शहरात पहिला तृतीयपंथीयांचा सामुदायिक विवाह सोहळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com