कॉलेजमध्ये आता बायोमेट्रिक हजेरी, कॉलेज बुडवणाऱ्या विद्यार्थ्यांवर वॉच

Biometric Attendance Mandatory Colleges Maharashtra: कॉलेजला दांडी मारणं आता विद्यार्थ्यांना महागात पडणार आहे... कारण कोचिंग क्लासच्या नावाखाली कॉलेजला दांडी मारणाऱ्या विद्यार्थ्यांना चाप लावण्यासाठी कॉलेजमध्ये बायोमेट्रिक हजेरी लावणं बंधनकारक करण्यात आलयं. त्यामुळे यापुढे वर्गात विद्यार्थ्यांवर कसा वॉच ठेवला जाणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Students marking biometric attendance in college as Maharashtra enforces strict rules to prevent dummy schooling and absenteeism.
Students marking biometric attendance in college as Maharashtra enforces strict rules to prevent dummy schooling and absenteeism.saam tv
Published On

ज्युनिअर कॉलेजला अँडमिशन घ्यायचं...कॉलेजमध्ये फक्त फी भरायची आणि वर्षाच्या शेवटी थेट परीक्षेलाच हजर राहायचं...बाकीचे दिवस फक्त आणि फक्त प्रायव्हेट कोचिंग क्लासेसमध्ये घालवायचे..हा 'डमी स्कूलिंग'चा पॅटर्न महाराष्ट्रात नवा नाही. पण आता या बेकायदेशीर पॅटर्नला ब्रेक लागणार आहे...अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'बायोमेट्रिक हजेरी' बंध

11-12वीच्या विद्यार्थ्यांची कॉलेजमधील हजेरीसाठी बायोमेट्रिक पद्धती

बोर्डाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना वर्षभरात 75% उपस्थिती बंधनकारक

कॉलेज बुडवणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक वर्गात CCTV कॅमेरे बसवणं बंधनकारक

हजेरी पडताळणीसाठी वर्गातील CCTVचं व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करण्याचे आदेश

महाविद्यालयांनी खासगी कोचिंग क्लासेससोबत केलेल्या करारांची शिक्षण विभागाकडून चौकशी होणार

विद्यार्थ्यांना 75 टक्के उपस्थिती अनिवार्य असूनही कोचिंग क्लासेसमध्ये जाणारे विद्यार्थी कॉलेजमध्ये गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे दाखल झालेत... त्यामुळे कृती आराखडा तयार करत बायोमेट्रिक हजेरीचा कठोर निर्णय घेण्यात आलाय... 'नीट' आणि 'जेईई' सारख्या परिक्षांमुळे राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील वर्गांमध्ये शुकशुकाट आणि कोचिंग क्लासेसमध्ये गर्दी, असे चित्र गेल्या काही वर्षांत पाहायला मिळतय.... या 'डमी' किंवा 'इंटिअर स्कूलिंग' पॅटर्नला चाप लावण्यासाठी शासनाने 100 कोटींचा मोठा आराखडा तयार करून डमी कोचिंगला चाप लावण्याचा प्रयत्न केलाय...त्यामुळे लाखो रुपयांची फी वसूल करून 'डमी अॅडमिशन'च्या जोरावर दुकानदारी चालवणाऱ्या कोचिंग क्लासेस चालकांचे धाबे दणाणलेत. आता हा आराखडा फक्त कागदावर राहतो की प्रत्यक्षात राज्यात त्याची अंमलबजावणी केली जाते....हे पाहणं महत्त्वाचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com