Electricity : १२५ युनिटपर्यंत मोफत वीज, निवडणुकीआधी बिहारच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Free electricity Bihar : बिहारमध्ये एक ऑगस्टपासून १२५ युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार, मुख्यमंत्री नितीश कुमार यांची निवडणूकपूर्व घोषणा, १.६७ कोटी कुटुंबांना थेट फायदा.
Electricity
Electricity saam tv
Published On

Free electricity for 125 units in Bihar 2025 : मोफत विजेची योजना आता बिहारपर्यंत जाऊन पोहचली आहे. होय, एक ऑगस्टपासून बिहारमध्ये १२५ युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे. राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ही घोषणा केली आहे. नितिशकुमार यांनी आपल्या एक्स खात्यावर मोफत वीज देणार असल्याची माहिती बिहारमधील जनतेला दिली आहे. दरम्यान, त्याशिवाय पुढील पाच वर्षांत एक कोटी लोकांना रोजगार मिळेल, असे अश्वासनही त्यांनी दिले आहे.

नीतीश कुमार यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, "आम्ही आधीपासूनच सर्वांना स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देत आहोत. आता एक ऑगस्ट २०२५ पासून, म्हणजेच जुलै महिन्याच्या बिलापासून, राज्यातील सर्व घरगुती ग्राहकांना १२५ युनिटपर्यंत वीज बिल भरावे लागणार नाही. या निर्णयामुळे राज्यातील एकूण १ कोटी ६७ लाख कुटुंबांना फायदा होईल"

पुढील तीन वर्षांत ग्राहकांच्या संमतीने घराच्या छतावर किंवा जवळच्या सार्वजनिक ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प बसवून, बिहारमधील जनतेला लाभ दिला जाईल.
नितीश कुमार, बिहार मुख्यमंत्री

कुटीर ज्योति योजनेअंतर्गत लाभ मिळेल

कुटीर ज्योति योजनेअंतर्गत अत्यंत गरीब कुटुंबांसाठी सौर पॅनेल बसवण्याचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलणार आहे. याशिवाय, इतरांना सौर पॅनेल बसवण्यासाठी सरकारी मदत दिली जाईल. यामुळे घरगुती ग्राहकांना 125 युनिटपर्यंत वीज बिलाचा खर्च करावा लागणार नाही. पुढील तीन वर्षांत बिहारमध्ये अंदाजे 10 हजार मेगावॅट सौरऊर्जा उपलब्ध होईल, असा अंदाज आहे.

Electricity
एकनाथ शिंदे -उद्धव ठाकरे एकत्र आले; पण एकमेकांकडे बघितलेही नाही; भविष्यातल्या राजकारणाचे काय आहेत संकेत?

निवडणुकीआधी घोषणांचा पाऊस

काही दिवसांत बिहारमध्ये विधानसभा निवडणुकींची घोषणा होणार आहे. त्याआधी नितिशकुमार यांच्याकडून मोठ मोठ्या घोषणा आणि अश्वासनाचा पाऊस पाडला जात आहे. २४ जून रोजी पेन्शन रक्कम वाढण्याची घोषणा केली होती. ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन ४०० रुपयांवरून थेट ११०० रुपये प्रतिमहा केली होती. तसेच, काही दिवसांपूर्वी १ कोटी लोकांना नोकरी देण्याचे आश्वासनही दिले होते. या प्रस्तावाला नीतीश यांच्या मंत्रिमंडळानेही मान्यता दिली आहे.

Electricity
Maharashtra Politics : शिवसेना फुटीनंतर एकाच फ्रेममध्ये, पण ठाकरेंनी शिंदेंना टाळलं, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com