Gold Rate Today: गुड न्यूज! सोनं २०००० रुपयांनी झालं स्वस्त; 18K- 22K आणि 24K चे आजचे दर किती?

Gold -Silver Price Today: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जळगावच्या सराफा बाजारात सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे.
Gold Rate Today: गुड न्यूज! सोनं २०००० रुपयांनी झालं स्वस्त; 18K- 22K आणि 24K चे आजचे दर किती?
Gold Price TodaySaam Tv
Published On
  • जळगावमध्ये सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण

  • १० तोळे सोनं २० हजारांनी स्वस्त झाले

  • चांदीचे दर १० हजार रुपयांनी स्वस्त झाली.

  • अमेरिका इराण तणावामुळे सोनं- चांदी स्वस्त झाली

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरामध्ये चढ-उतार सुरूच आहे. आज जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. १० तोळा सोनं तब्बल २०,००० रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर १ किलो चांदी १०,००० रुपयांनी स्वस्त झाली आहे. त्यामुळे आज ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जळगावच्या सराफा बाजारात सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका- इराण या दोन्ही देशांमधील तणाव वाढल्याने सोनं-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जळगावचा सुवर्ण बाजार उघडताच आज सकाळी सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले. सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. २४ कॅरेटच्या एक तोळा सोन्याच्या दरात २,००० रुपयांची घसरण झाली. तर १० तोळा सोन्याच्या दरामध्ये २०,००० रुपयांची घसरण झाली.

Gold Rate Today: गुड न्यूज! सोनं २०००० रुपयांनी झालं स्वस्त; 18K- 22K आणि 24K चे आजचे दर किती?
Gold Rate Today: आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याची चमक हरपली; बाजारभावात मोठी पडझड, जाणून घ्या 24k, 22k, 18k सोन्याचे दर

२४ कॅरेटचे एक तोळा सोनं १,५५,००० रुपयांवर आले आहे. पण हे सोनं खरेदी करताना ग्राहकांना जीएसटीसह १,६१,००० रुपये मोजावे लागणार आहेत. तर २४ कॅरेटचे १० तोळा सोनं १५,५०,००० रुपयांवर आले आहे. तर जीएसटीसह हे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १६,१०,००० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर दुसरीकडे चांदीचे दरात देखील मोठी घसरण झाली आहे. १ किलो चांदीच्या दरामध्ये १० हजार रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचे दर २ लाख ६५ हजार रुपयांवर आले आहे. पण खरेदी करताना ग्राहकांना जीएसटीसह २ लाख ७० हजार रुपये खर्च करावे लागतील.

Gold Rate Today: गुड न्यूज! सोनं २०००० रुपयांनी झालं स्वस्त; 18K- 22K आणि 24K चे आजचे दर किती?
Gold Rate Today: सलग चौथ्या दिवशी सोन्याचे दर वाढले; तब्बल इतक्या रुपयांची वाढ; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

अमेरिका- इराण यांच्यात पुन्हा तणाव निर्माण झाल्याने सोने- चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोनं-चांदी स्वस्त झाल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सध्या धोंड्याचा महिना सुरू असून जावयाचा सोनं किंवा चांदीचे दागिने आणि भेटवस्तू देऊन त्यांचा पाहुणचार केला जातो. धोंड्याच्या महिन्यात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सोनं-चांदी खरेदीसाठी सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

Gold Rate Today: गुड न्यूज! सोनं २०००० रुपयांनी झालं स्वस्त; 18K- 22K आणि 24K चे आजचे दर किती?
Gold Price Today: सोनं झालं स्वस्त! प्रति तोळा इतक्या रूपयांवर, जाणून घ्या २४ आणि २२ कॅरेट सोन्याचा आजचा भाव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com