Ajit Pawar : अजित पवार यांना मोठा दिलासा, आयकरकडून जप्त केलेली मालमत्ता मुक्त

Ajit Pawar ,NCP : अजित पवार यांना मोठा दिलासा मिळालाय. २०२१ मध्ये जप्त करण्यात आलेली संपत्ती रिलीज करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच अजित पवार यांना दिलासा मिळाला आहे.
अजित पवार
अजित पवार, Ajit Pawar ,NCPSaam Tv
Published On

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली लवादाकडून जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्यात आली आहे. शुक्रवारी दिल्ली ट्रिब्यूनल कोर्टाने याबाबतच निर्णय दिला होता. पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी सबंधित जप्त मालमत्ताही कोर्टाने मोकळी केली आहे. स्पार्कलिंग सॉइल, गुरु कमोडिटी, फायर पॉवर अग्री फार्म आणि निबोध ट्रेडिंग कंपनीशी सबंधित मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. या सर्व मालमत्ता मुक्त करण्यात आल्या आहेत. (Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar has received significant relief as his properties have been freed from Income Tax proceedings)

आयकर विभागाने अजित पवारांची जप्त केलेली संपत्ती मुक्त केली आहे. दिल्लीतील ट्रिब्यूनल कोर्टाकडून याबाबतचे आदेश शुक्रवारी जारी केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि पत्नी सुनित्रा पवार यांची सपत्ती आयकर विभागाने जप्त केली होती. आता न्यायालयाच्या आदेशानुसार, ही संपत्ती मुक्त करण्यात येणार आहे. लवकरच अजित पवार यांच्या कुटुंबाकडे ही संपत्ती सुपूर्द करण्यात येईल.

अजित पवार
Ajit Pawar DCM: अजित पवार यांचा नवा विक्रम; 4 मुख्यमंत्री बदलले तरी उपमुख्यमंत्री तोच

7 ऑक्टोबर 2021 मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विविध मालमत्तेवर आयकर विभागाने छापेमारी केली होती. त्यावेळी त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. ऑक्टोबर 2021 मध्ये आयकर विभागाने छापा टाकून अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांशी कथितपणे संबंधित असलेली अंदाजे 1,000 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. अजित पवार व त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित मुंबईतील प्रतिष्ठित नरिमन पॉइंट येथील निर्मल टॉवरसह पाच मालमत्तांवर टाच आणून ती जप्त करण्यात आली होती. त्याशिवाय एक साखर कारखाना आणि एक रिसॉर्टवरही जप्ती आणल्याचं त्यावेळी समोर आले होते.

अजित पवार
Ajit Pawar Net Worth: गाड्या, बंगले अन् करोडोंची संपत्ती, अजित दादांची एकूण कमाई किती?

आयकर विभागाने संपत्ती जप्त केल्यानंतर अजित पवार यांनी कोर्टात धाव घेतली होती. आम्ही नियमित टॅक्स भरतो, कुठलाही कर चुकवलेला नाही, असे अजित पवार यांनी कोर्टात सांगतले होते. आता दोन वर्षानंतर याबाबत निर्णय झाला आहे. शुक्रवारी दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाने अजित पवारांना मोठा दिलासा देत आयकर विभागाची अपील फेटाळली. अजित पवारांची जप्त संपत्ती मुक्त करण्याचे आदेशही दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com