Ajit Pawar DCM: अजित पवार यांचा नवा विक्रम; 4 मुख्यमंत्री बदलले तरी उपमुख्यमंत्री तोच

Ajit Pawar Record: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देशात एक मोठा विक्रम केलाय. गेल्या ३३ वर्षांच्या आपल्या राजकीय कारकीर्दीत अजित पवारांनी कोणता नवा विक्रम केलाय पाहूया त्यावचा हा विशेष रिपोर्ट.
 Ajit Pawar DCM
Ajit Pawar Recordsaam Tv
Published On

आजवर महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री राहिलेल्या कोणालाही मुख्यमंत्री होता आलं नाही पण 5 डिसेंबर 2024 ला देवेंद्र फडणवीसांनी तो रेकॉर्ड तोडला. परंतु याचवेळी एकच पद सहावेळा मिळवण्याचा अजित पवारांनी आणखीन एक रेकॉर्ड केला तो देशातच काय तर जगातही कोणाला मोडता येणार नाही.

महाराष्ट्रात गेल्या 14 वर्षांत ४ मुख्यमंत्री आले पण उपमुख्यमंत्री पदी अजित पवार कायम राहिले. अजित पवारांनी आजवर कोणकोणत्या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पाहूया.

अजितदादांचा मुख्यमंत्रिपदाचा विक्रम

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकार

नोव्हेंबर २०१० सप्टेंबर २०१२

पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री

अजित पवार उपमुख्यमंत्री

दुसऱ्यांदा

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकार

ऑक्टोबर २०१२ - सप्टेंबर २०१४

पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री

अजित पवार उपमुख्यमंत्री

तिसऱ्यांदा

भाजप सरकार

२०१९ (पहाटेचा शपथविधी)

२३ नोव्हेंबर २०१९ ते २६ नोव्हेंबर २०१९

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री

अजित पवार उपमुख्यमंत्री

चौथ्यांदा

मविआ सरकार

डिसेंबर २०१९ ते जून २०२२

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री

अजित पवार उपमुख्यमंत्री

पाचव्यांदा

महायुती सरकार

जुलै २०२३ ते नोव्हेंबर २०२४

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री

अजित पवार उपमुख्यमंत्री

सहाव्यांदा

महायुती सरकार

५ डिसेंबर २०२४

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री

अजित पवार उपमुख्यमंत्री

 Ajit Pawar DCM
Ajit Pawar: तिन्ही नेते एकत्र अन् खळखळाट; व्हिडिओ होतोय व्हायरल, अजितदादा सर्वात आनंदी असण्याचे गुपित काय?

आधी बारामतीचे खासदार मग 1991 पासून बारामतीचे आमदार म्हणून सलग 33 वर्ष अजित पवार महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यांच्या मागून थेट केंद्रातून राज्यात आलेले पृथ्वीराज चव्हाण, अजित दादा खासदार असतांना नगरसेवक असणारे देवेंद्र फडणवीस, अजित दादा कॅबिनेट मंत्री असतांना पहिल्यांदा विधीमंडळात आलेले एकनाथ शिंदे आणि अजित दादा आमदार असतांना राजकारणात नसणारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. पण अजित पवारांची गाडी गेल्या 33 वर्षांपासून उपमुख्यमंत्री पदावरुन पुढे सरकली नाही.

गेल्या अनेक वर्षात आमदार, मंत्री आणि उपमुख्यमंत्री असतांना अजित पवारांनी मुख्यमंत्रीपद न मिळाल्याची खंत हसता हसता का होईना पण बोलून दाखवली. गेल्या ३ दशकातील संसदीय राजकारणात अजित पवारांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला परंतू उराशी मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न बाळगून असले तरी सध्याच्या बदलत्या आणि अस्थिर राजकारणाकडे पाहिलं तर दादा मुख्यमंत्री होतील याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र मुख्यमंत्रिपदाच्या प्रतीक्षेत अजितदादांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राष्ट्रीय विक्रम केलाय आणि हा विक्रम मोडणं नजिकच्या भविष्यात तरी शक्य नाही. एवढं मात्र नक्की.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com