Eknath Shinde’s Sena Strengthens in Kalyan-Dombivli
Eknath Shinde’s Sena Strengthens in Kalyan-DombivliSaam

कल्याण - डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली; शरद पवार गटातील बडा नेता गळाला लागला

Eknath Shinde’s Sena Strengthens in Kalyan-Dombivli: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील पदाधिकारी प्रकाश तरे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश.
Published on
Summary
  • कल्याण डोंबिवलीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला धक्का.

  • पदाधिकारी प्रकाश तरे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश.

  • कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली.

कल्याण डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. कल्याण डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला धक्का बसला आहे. शरदचंद्र पवार गटातील पदाधिकारी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश पार पडला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला धक्का मानला जात आहे.

सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच पार पडतील. याच पार्श्वभूमीवर अनेक तालुक्यांमध्ये राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. अशातच कल्याण डोंबिवलीतही मोठी राजकीय घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील पदाधिकारी प्रकाश तरे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

Eknath Shinde’s Sena Strengthens in Kalyan-Dombivli
पश्चिम महाराष्ट्रातील ठाकरे गटाचा बडा नेता भाजपच्या वाटेवर, पालकमंत्र्यांच्या भेटीनंतर चर्चेला उधाण

प्रकाश तरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतलं आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश पार पडला असल्याची माहिती आहे. या पक्षप्रवेशाबाबत तरे म्हणाले, 'उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना कायम सामान्य जनतेसाठी काम करीत आली आहे. विकासाच्या वाटचालीत सहभागी होण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश केलाय', असं तरे म्हणाले.

Eknath Shinde’s Sena Strengthens in Kalyan-Dombivli
'बहिणीवर बलात्कार अन् आईला आयुष्य संपवण्यास प्रवृत्त', माजी मंत्र्यांवर बायकोचे खळबळजनक आरोप

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या सहकाऱ्याचे स्वागत केले आहे. प्रकाश तरे यांच्या पक्षप्रवेशामुळे कल्याण डोंबिवलीत शिवसेनेची ताकद वाढली असल्याची चर्चा आहे. या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या स्थानिक संघटनेला मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com