

माजी उपमहापौर राजू शिंदे भाजपमध्ये घरवापसी करणार
ठाकरे गट सोडल्यानंतर पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करताहेत
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडणार
निवडणुकीआधी भाजपची ताकद संभाजीनगरमध्ये वाढण्याची शक्यता
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील बहुतांश नगरपरिषद, महापालिका वार्डाची आरक्षण सोडत जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांची लगबग देखील वाढली आहे. सत्ताधारी भाजपकडून राज्यातील विविध भागात चाचपणी सुरु झाली आहे. भाजपकडून सर्व भागात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुरु आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीआधी बडा नेता भाजपमध्ये घरवापसी करणार आहे.
आगामी निवडणुकीआधी छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय उलथापालथ होताना पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील माजी उपमहापौर राजू शिंदे यांची भाजपमध्ये घरवापसी होणार आहे. ते १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटातून सोडचिठ्ठीत देत राजू शिंदेंनी चंद्रकांत खैरे यांच्यावर आरोप करत प्रतिस्पर्धी उमेदवारांना फायदा होईल असे राजकारण केल्याचा आरोप केला होता.
राजू शिंदे यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी शिवसेनेकडून देखील प्रयत्न होत असल्याची माहिती मिळत आहे. राजू शिंदे यांनी ठाकरे गटात प्रवेश करत विधानसभा निवडणूकही लढवली होती. या निवडणुकीत त्यांना जवळपास १ लाखांहून अधिक मते पडली होती. मात्र, मूळचे भाजपचे असलेले राजू शिंदे हे पुन्हा घरवापसी करणार आहेत.
भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे. सोबतच, शिवसेनेला शह देत २०२९ साठी स्वबळाची मोर्चेबांधणी सुरु असल्याचं बोललं जात आहे. एकीकडे, समन्वय समितीची बैठक पार पडत असताना दुसरीकडे मात्र स्वतंत्र्य आपले पक्ष वाढवण्यासाठी महायुतीच्याच पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.