Maharashtra Politics: मोठी बातमी! सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार, भाजप-शिवसेनेतील वाद मिटला

Municipal Elections: राज्यातील सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्रित लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भाजप-शिवसेनेतील वाद मिटला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Maharashtra Politics: मोठी बातमी! भाजप-शिवसेनेतील वाद मिटला, सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार
MahayutiSaam Tv News
Published On

Summary -

  • भाजप आणि शिंदे शिवसेनेतील वाद मिटला

  • महायुती सर्व २९ महापालिका निवडणुका एकत्र लढणार

  • रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली

  • जागावाटपासाठी स्थानिक पातळीवर समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला गेला

राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. महापालिका निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात दिल्लीत खलबतं झाली असून सर्व महापालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढविण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच महायुतीमध्ये असलेला तिढा अखेर सुटला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली असून गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये सुरू असलेल्या अंतर्गत कलहावर पडदा पडला आहे.

रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तोडगा काढण्यात आला आहे. महायुती सर्व महापालिका निवडणुका एकत्रित लढवणार असल्याबाबत चर्चा झाली. कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि उल्हासनगर या शहरांमध्ये युती म्हणूनच सामोरे जाण्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली. अशातच रवींद्र चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद देत नेमकं या बैठकीत काय झालं याची माहिती दिली. तसंच, 'मुंबईसह प्रमुख पालिकेत युती व्हावी याबाबत आमच्यात सकारात्मक चर्चा झाली.', अशी माहिती रवींद्र यांनी दिली.

Maharashtra Politics: मोठी बातमी! भाजप-शिवसेनेतील वाद मिटला, सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार
Maharashtra Politics : NCP अजित पवार गटाच्या आमदाराला मोठा धक्का, कोट्यवधींच्या घोटाळा प्रकरणात सख्ख्या पुतण्याला अटक

रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, 'महापालिका निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता आहे. आमच्या झालेल्या बैठकीत निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. समिती तयार करून पुढील निर्णय घेण्यात येईल. समिती तयार करून प्राथमिक पातळीवर चर्चा केली जाईल. मुंबईसह प्रमुख महापालिकेत युती व्हावी. सर्व ठिकाणी महायुतीतच निवडणूक लढवण्याबाबत आम्ही सकारात्मक चर्चा केली.' त्यामुळे आता महायुती सर्व महापालिका निवडणुका एकत्रित लढवणार असल्याचा निर्णय झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Maharashtra Politics: मोठी बातमी! भाजप-शिवसेनेतील वाद मिटला, सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार
Maharashtra Politics : पालिका निवडणुकीत एकमेकांवर तुटून पडतात, निवडणूक होताच... सोशल मीडियावर नेत्यांविरोधात जनतेचा संताप

तसंच, 'मुंबई आणि ठाण्यासह प्रमुख शहरांमध्ये युती व्हायलाच हवी असे सर्व वरिष्ठ नेत्यांनी बैठकीत सांगितले. जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी स्थानिक पातळीवर ४-५ पदाधिकाऱ्यांच्या कमिट्या स्थापन केल्या जातील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला जाईल.', असे देखील रवींद्र चव्हाण म्हणाले. राज्यातील आगामी २९ महानगरपालिकांच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्रित लढवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

Maharashtra Politics: मोठी बातमी! भाजप-शिवसेनेतील वाद मिटला, सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार
Maharashtra Politics: पुणे-मुंबई-ठाण्यात महायुती तुटली? निवडणुकीआधीच ब्रेकअप?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com