ST Strike Called Off: सर्वात मोठी बातमी; ST कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, पगारात भरघोस वाढ करण्याचा सरकारचा निर्णय
St Strikesaam tv

ST Strike Called Off: सर्वात मोठी बातमी; ST कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, पगारात भरघोस वाढ करण्याचा सरकारचा निर्णय

ST Strike Called Off: राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय.
Published on

ऐन गणेशोत्सवाच्या काळात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ३ सप्टेंबर रोजी संपला पुकारला होता.आज मुख्यमंत्र्यांसोबत महामंडळाच्या शिष्टमंडळाची बैठक पार पाडली. या बैठकीत संपावर तोडगा निघालाय. सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात ६,५०० रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात

कालपासून सुरू असलेल्या संप आज मागे घेण्यात आला. संपच्या दुसऱ्या दिवशी राज्यभरातील एसटीच्या 251 पैकी 94 आगार पूर्णत बंद होते. तर 92 आगारांमध्ये अंशतः वाहतूक सुरू होती. 65 आगारामध्ये पूर्ण वाहतूक सुरळीत सुरू होती. आज संपाच्या दुसऱ्या दिवशी 40069 नियोजित फेऱ्या पैकी आंदोलनामुळे 27470 फेऱ्या रद्द झाल्या आहेत. दिवसभर सुमारे 70% वाहतूक बंद होती. आज दिवसभर सुमारे 22 कोटी रुपयांचा महसूल बुडाला.

ST Strike Called Off: सर्वात मोठी बातमी; ST कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, पगारात भरघोस वाढ करण्याचा सरकारचा निर्णय
Toll Free: गणेशभक्तांना कोणकोणत्या मार्गांवर टोलमाफी, पास कसा मिळवाल! वाचा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दि.1 एप्रिल, 2020 पासून सरसकट मुळ वेतनात 6500 रुपये वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकराने घेतलाय. ऐन गणेशोत्सवाच्या काळात संप पुकारल्याने प्रवाशाचे हाल होणार होते. ही बाब लक्षात घेत सरकारने महामंडळाच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांनी बैठक झाली. जवळपास दोन तास झालेल्या या बैठकीत तोडगा निघाला. मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतला.

आज एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दि.1 एप्रिल, 2020 पासून सरसकट मुळ वेतनात 6500 रुपये वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकराने घेतलाय. ऐन गणेशोत्सवाच्या काळात संप पुकारल्याने प्रवाशाचे हाल होणार होते. ११ कामगार संघटनांच्या कृती समितीने आंदोलनाचे हत्यार उपसले होते. ही बाब लक्षात घेत सरकारने महामंडळाच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. जवळपास दोन तास झालेल्या या बैठकीत तोडगा निघाला. मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतला.

संघटनांनी यावेळी केलेल्या वेतनवाढीच्या मागणीबाबत मधला मार्ग काढून एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची भूमिका असल्याचे सांगत एप्रिल 2020 पासून कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात 6500 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. त्याचबरोबर राज्यातील आगारांमध्ये चालक-वाहकांसाठी असणारी विश्रामगृहांची दुरवस्था दूर करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. चालक-वाहकांना चांगल्या सोयीसुविधा मिळायला पाहिजेत, असे सांगतानाच एसटीचा महसुल वाढीसाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

ST Strike Called Off: सर्वात मोठी बातमी; ST कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, पगारात भरघोस वाढ करण्याचा सरकारचा निर्णय
Special Report: गणेशोत्सवाच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांचा संप, प्रवाशांची लूट

एसटी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती बाबत विषयी चर्चा करताना राज्य शासनाने सर्वांसाठी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना केली असून त्याच्याशी संलग्न योजना एसटी महामंडळाने करावी, त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना होईल, अशी सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपाबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतल्यानंतर सह्याद्री अतिथीगृहाच्या बाहेर श्रेयवादाची लढाई बघायला मिळाली. गुणरत्न सदावर्ते, जयश्री पाटील यांनी श्रीरामाच्या घोषणा दिल्या. आणि कृती समिती बोलत असताना त्यांच्यामध्ये घुसून श्रेया लाटण्याचा प्रयत्न केला. दरम्यान कृती समितीतर्फे देखील मराठा संदर्भात घोषणा देण्यात आल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com