Crime case: पुण्याच्या महिला डॉक्टरला गंडवणाऱ्या डॉक्टराला बेड्या, विवाहित असताना दिला गुलिगत धोका

Bibwewadi News: बिबवेवाडी पोलिसांनी डॉक्टर कुलदीप आदिनाथ सावंत आरोपीला नवी मुंबईतून अटक केली आहे. सावंतने विवाहविषयक संकेतस्थळावर अविवाहित असल्याची खोटी नोंदणी करून डॉक्टर तरुणीला फसवलं होतं.
Crime News
Crime News yandex
Published On

सचिन जाधव, साम टीव्ही

बिबवेवाडी पोलिसांनी डॉक्टर कुलदीप आदिनाथ सावंत (वय ३०) या आरोपीला नवी मुंबईतून अटक केली आहे. सावंतने विवाहविषयक संकेतस्थळावर अविवाहित असल्याची खोटी नोंदणी केली. नंतर डॉक्टर तरुणीला फसवलं. तिच्याकडून १० लाख रुपये उकळल्यानंतर तरूणीनं विवाहाबाबत विचारल्यावर स्वतः विवाहित असल्याचा खुलासा केला. या धक्क्याने तरुणीने आत्महत्या केली. या प्रकरणी तरूणीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?

आरोपी सावंत यानं एका विवाहविषयक संकेत स्थाळावर नोंदणी केली होती. नोंदणी केल्यानंतर त्याची ओळख डॉक्टक तरूणीशी झाली. दोघांमध्ये मैत्री झाली. सांवत विवाहित होता, त्यानं ही बाब मुलीपासून लपवली. त्यानंतर डॉक्टर तरूणीला जाळ्यात ओढण्याचं काम त्यानं केलं. तिच्याकडून १० लाख रूपये घेतले. तरूणीनं काही दिवसानंतर लग्नाबाबत विचारणा केली. तेव्हा त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली. तसेच पैसेही दिले नाहीत.

Crime News
Gangapur Crime Case: मुलाचा मृतदेह शासनाने पोहोचवावा; अंत्ययात्रा न काढता अंत्यसंस्कार करा; खंडपीठाचा आदेश

तरूणीनं जाब विचारले असता, त्यानं विवाहित असल्याचा खुलासा केला. डॉक्टर तरूणीला धक्काच बसला. त्यानंतर तिनं स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला. तरूणीनं बिबवेवाडीत असलेल्या दवाखान्यात विषारी औषध खात आत्महत्या केली. या घटनेबद्दल तरूणीच्या वडीलांना माहिती मिळताच त्यांनी बिबवेवाडी पोलीस ठाणे गाठले. तसेच डॉक्टर आरोपी विरोधात तक्रार दाखल केली.

Crime News
Guillain-Barré Syndrome: मेंदू व्हायरसचं थैमान, २४ पेशंट व्हेंटिलेटरवर; केंद्राचं पथक पुण्यात

आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सावंत पसार झाला. बिबवेवाडी पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. आरोपी नवी मुंबईत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकानं कारवाई करत आरोपी सावंतला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com