समृद्धी महामार्गाबाबत (Samruddhi Mahamarg) महत्वाची बातमी समोर आली आहे. समृद्धी महामार्गाला सुरूवात होणाऱ्या ठाणे (Thane) जिल्ह्यातील आमणे भागामधील ४६ गावांची आमणे नोड अधिसूचित क्षेत्र म्हणून घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाजवळची ४६ गावं MSRDC कडे जाणार आहेत. या ४६ गावांमध्ये भिवंडी तालुक्यातील ३२ गावं आणि कल्याण तालुक्यातील १४ गावांचा समावेश आहे. ही कोणकोणती गावं आहेत हे आपण सविस्तर रित्या पाहणार आहोत...
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यासाठी राज्य सरकारने सोमवारी मान्यता दिली. समृद्धी महामार्गाशेजारच्या भिवंडी परिसरातील जवळपास ११५ चौरस किलोमीटर भाग आता MSRDC च्या अधिपत्याखाली असणार आहे. भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणात वेअरहाऊस आहेत. या भागाच्या नियोजनबद्ध आणि संतुलित विकासाची जबाबदारी आता MSRDC वर सोपविण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे नगरविकास विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केला आहे.
MSRDC ला भिवंडी तालुक्यातील ३२ गावे आणि कल्याण तालुक्यातील १४ गावे मिळून सुमारे ११ हजार ५०० हेक्टर भागासाठी प्रारूप विकास योजना तयार करायची आहे. त्याचसोबत MSRDC ला याची विकास नियंत्रण नियमावली तयार करावी लागणार आहे. समृद्धी महामार्गासह प्रस्तावित विरार अलिबाग बहुद्देशीय मार्ग, दिल्ली -मुंबई महामार्ग हे भिवंडी परिसरातून जात आहेत. त्याचसोबत भविष्यात या ठिकाणावरून जेएनपीटीसह वाढवणमधील प्रस्तावित बंदराला मालाची वाहतूक होणे अपेक्षित आहे. त्यातून परिसरात लॉजिस्टिक हब आणि वेअर हाऊसचा सुनियोजित विकास होणे आवश्यक आहे. यासाठीच शासनाकडून MSRDC ची या भागाच्या विकासासाठी नेमणूक करण्यात आली आहे.
महत्वाचे म्हणजे, भिवंडीतील काही गावांमध्ये औद्योगिक विकास केंद्र प्रस्तावित होते. त्यामुळे या गावांसाठी शासनाकडून MIDC ची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक केली होती. पण त्यानंतर शासनाने MIDC ची नेमणूक रद्द करून ही गावे आता MSRDC ला दिली आहे. त्यामुळे आता भिवंडी परिसराचा वेगाने विकास होण्यास मदत होईल. त्याचसोबत याठिकाणच्या नागरिकांना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होतील.
आमणे, आतकोली, अर्जुनाली, बापगाव, भादाने, भवाले, भोईरगाव, बोरीवली तर्फ सोनाळे, चिराडपाडा, देवरुंग, ईताडे, जानवल, खांडवल, किरवली तर्फे सोनाळे, कुकसे, लोनाड, मुथवल, नांदकर, पडघा (सिटी), पिसे, सांगे, सापे, सावड, शिवनगर, तळवली तर्फे सोनाळे, उसरोली, वाहुली, वाशेरे, आन्हे, बोरीवली तर्फे राहूर, कुरुंद आणि वांद्रे.
गुरवली, खडवली, कोंडेरी, नाडगाव, निंबावली, ओझरीं, राये, सांगोडे, वासुंद्री, आंबिवली तर्फे वासुंदी, चिचवली, मोस, पितांबरेनगर आणि उटणे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.