Ravikant Tupkar: राज्य सरकार सरसकट कर्जमाफीसाठी सकारात्मक नाही , रविकात तुपकरांचा गंभीर आरोप

Farmer Loan : शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नका,अन्यथा निवडणुकीत झटका देणार असल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिलाय.
Ravikant Tupkar: राज्य सरकार सरसकट कर्जमाफीसाठी सकारात्मक नाही , रविकात तुपकरांचा गंभीर आरोप
Ravikant Tupkar
Published On

राज्य सरकार मात्र सोयाबीन, कापूस यांच्या दरवाढीसंदर्भात सरकार सकारात्मक आहे. मात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यासाठी सरकार सकारात्मक नसल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केलाय. सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी रविकांत तुपकर यांनी अजित पवार यांची भेट घेतली.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीनंतर तुपकर यांनी माध्यमांशी संवाद साधतांना सरकारला गंभीर इशारा दिलाय. सरकारने शेतकऱ्यांच्या भावानांशी खेळ केला तर पुढील निवडणुकीत सरकारला इटका देणार असल्याचा इशारा दिलाय.

सोयाबीन आणि कापूसच्या दरासंदर्भात सरकारचं शिष्टमंडळ अमित शहा याच्याकडे जाणार आहे. कर्जमाफीच्या योजनेत अनेक शेतकऱ्यांचे लोकांचे पैसे बाकी आहेत. ते पैसे आम्ही देऊ. विमा कंपनीवर आम्ही कडक कारवाई करतो, असा शब्द अजित पवारांनी दिल्याचं म्हणत काही अंशी आमच्या आंदोलनला यश आल्याचं तुपकर म्हणालेत.

सोयाबीन, कापसाला दरवाढ मिळणं ही जेवढी शेतकऱ्यांची गरज आहे, तेवढीच ती राजकीय नेत्यांची देखील आहे. अन्यथा, येणाऱ्या निवडणुकीत लोक फिरू देणार नाही एवढं पुढाऱ्यांनी लक्षात घ्यावं, असा इशारा रविकांत तुपकर म्हणालेत.

संबंधित खात्यांच्या सचिवांसोबत आपल्या बैठक झाली असून या बैठकीत सोयाबीन आणि कापसाच्या दरवाढ किती आवश्यक आहे याची माहिती देण्यात आली. त्यादृष्टीकोनातून चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे राज्याचं शिष्टमंडळ जाणार असून दरवाढीबाबत निर्णय घेण्यासाठी सूचित करू. शिष्टमंडळासोबत काही शेतकऱ्यांचे प्रतिनिधीदेखील दिल्ली पाठवणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितल्याचं तुपकर म्हणालेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या काही लाभार्थ्यांना अजून पैसा मिळाला नाही त्यांना सरकार पैसा देणार आहे. मात्र सरसकट कर्जमाफीसाठी सरकार सकारात्मक नसल्याचं तुपकर म्हणालेत.

Ravikant Tupkar: राज्य सरकार सरसकट कर्जमाफीसाठी सकारात्मक नाही , रविकात तुपकरांचा गंभीर आरोप
Hingoli News : हिंगोलीत खळबळ.. भल्या पहाटे दोघांची रेल्वेसमोर उडी; एका शेतकऱ्याचा समावेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com