भिगवण तरुणी अपहरण प्रकरणात ट्विस्ट; मुलीने कोर्टात कुटुंबीयांना नेमकं काय सांगितलं? आईच्या पायाखालची जमीनच सरकली

bhigwan girl kidnap case : भिगवण तरुणी अपहरण प्रकरणाला नवीन वळण लागल्याचे समोर आलं आहे. मुलीच्या जबाबाने आईच्या पायाखालची जमीन सरकल्याचे समोर आलं आहे.
bhigwan girl kidnap case update
bhigwan girl kidnap case Saam tv
Published On
Summary

भिगवण युवती अपहरण प्रकरणाला नवीन वळण

बारामती शहर पोलीस ठाण्यात झाले दोघेही हजर

मुलीचे प्रतिज्ञापत्र सोशल मीडियावर व्हायरल

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील अपहरण प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अपहरण झालेली मुलगा आणि मुलगी गुरुवारी रात्री बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागल्याचे पाहायला मिळालं.

पुण्याच्या भिगवण येथील 21 वर्षीय मुलीचे अपहरण झालं होतं, अशी तक्रार मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात केली होती. तिच्या आणि मुलाच्या डोळ्यात चटणी टाकून अपहरण करण्यात आलं होतं, असा आरोप तक्रारीत केला होता. याबाबत इंदापूर तालुक्यातील भिगवण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. ही बातमी कळताच संतप्त नागरिकांनी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखला. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती. त्यानंतर बुधवारी भिगवण बंदची हाक देण्यात आली होती. या हाकेला भिगवणकरांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला होता.

bhigwan girl kidnap case update
वर्ल्ड कपमधील मिस्ट्री गर्ल कोण? फोटो पाहून लाखो फॉलोअर्स पडले प्रेमात? VIDEO

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली दुपारी हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र त्यापूर्वीच मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पण माझे अपहरण झाले नसून मी स्वतःच्या मर्जीने त्या युवकासोबत गेल्याचे मुलीने सांगितले. मुलीवर दबाव टाकून हा व्हिडिओ काढल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलाय.

bhigwan girl kidnap case update
खासगी कंपनीतील बड्या अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; हत्या की आत्महत्या? व्यावसायिकांमध्ये खळबळ

अपहृत मुलगी आणि मुलगा हे गुरुवारी मध्यरात्री दोन वाजता बारामती पोलीस ठाण्यात हजर झाले. याच कालावधीत मुलीने प्रतिज्ञापत्र देखील सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले. दुसरीकडे आमची मुलगी पळून गेलेली नसून तिला जबरदस्तीने उचलून नेण्याचा आरोप मुलीच्या आईने केला आहे.

bhigwan girl kidnap case update
माझ्या नादी लागू नका, जरांगेंचा मुंडेंना इशारा; आता संघर्ष आणखी पेटणार? VIDEO

तरुण-तरुणी दोघेही बारामती पोलीस ठाण्यात आले होते. त्यांचा जबाब नोंदवला आहे. मुलगी आणि आईच्या जबाबात तफावत आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. मुलीला न्यायालयात हजर केले. त्यावेळी मुलीनं आईकडे जाण्यास नकार दिला. या प्रकरणी सखोल तपास सुरू असून त्यातून कोणती वेगळी माहिती पुढे येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com