Bhide Guruji: भिडे गुरुजींवर कुत्र्याचा हल्ला, जखमी अवस्थेत सरकारी रुग्णालयात केले दाखल

Sangli News: सांगलीमध्ये भिडे गुरूजींवर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली. कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या संभाजी भिडे यांच्यावर सांगली जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Bhide Guruji: भिडे गुरुजींवर कुत्र्याचा हल्ला, शासकिय रुग्णालयात उपचार सुरू
Sambhaji Bhidesaam tv
Published On

विजय पाटील, सांगली

सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. कार्यक्रमावरून घराच्या दिशेने जात असताना संभाजी भिडे गुरुजींवर कुत्र्याने हल्ला करत त्यांच्या पायाला चावा घेतला. सांगली शहरातील माळी गल्ली या ठिकाणी हा प्रकार घडला.

कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या भिडे गुरूजींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास धारकरांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आटपून ते घरी जात होते तेव्हा ही घटना घडली. धारकऱ्यांनी त्यांना रुग्णालयात नेलं त्याठिकाणी उपचार घेतल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले असल्याचे देखील सांगितले जात आहे.

Bhide Guruji: भिडे गुरुजींवर कुत्र्याचा हल्ला, शासकिय रुग्णालयात उपचार सुरू
Sambhaji Bhide: मनमाडमध्ये भीमसैनिकांनी अडवली संभाजी भिडेंची गाडी; पोलिसांकडून अनेकांची धरपकड, पाहा VIDEO

संभाजी भिडे यांना सांगलीमध्ये कुत्रा चावल्याच्या घटनेनंतर महापालिकेला जाग आली असून शहरातील कुत्रे पकडण्याची मोहीम पालिकेने सुरू केली आहे.ज्या ठिकाणी संभाजी भिडे यांना कुत्र्याने चावा घेतला त्या परिसरात महापालिकेकडून कुत्रे पकडण्याची मोहीम पालिकेकडून राबवण्यात आली आहे. त्याचबरोबर शहरातल्या विविध भागात देखील आता महापालिकेकडून कुत्रे पकडण्यात येत आहेत.

Bhide Guruji: भिडे गुरुजींवर कुत्र्याचा हल्ला, शासकिय रुग्णालयात उपचार सुरू
Sambhaji Bhide Video: नट्यांनी, ड्रेस घातलेल्या महिलांनी वटसावित्रीच्या पूजेला जाऊ नये; संभाजी भिडे यांचं वादग्रस्त विधान

सांगली शहरातल्या माळी गल्ली या ठिकाणी रात्रीच्या सुमारास संभाजी भिडे यांना एका कुत्र्याने चावा घेतल्याचा प्रकार घडला होता त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून आता शहरातल्या भटके कुत्र्यांना पकडण्यात येत आहे. सांगली महानगर पालिकेच्या डॉग व्हॅन पथकाकडून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

Bhide Guruji: भिडे गुरुजींवर कुत्र्याचा हल्ला, शासकिय रुग्णालयात उपचार सुरू
Sambhaji Bhide : माणसं एकनिष्ठ नसतात, तेवढी कुत्री असतात; 'वाघ्या कुत्रा' समाधी प्रकरणात संभाजी भिंडेंची उडी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com