Bhandara : अन् अचानक आकाशातून पडले दगडाचे तुकडे, भंडार्‍यात उल्का वर्षाव झाल्याचा संशय, नेमकं सत्य काय?

Bhandara Ulka News : भंडारा जिल्ह्यातील परसोडी परिसरात आकाशातून दोन रहस्यमयी दगडाचे तुकडे पडल्याची घटना उघडकीस आली आहे. हे तुकडे उल्का असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Bhandara : अन् अचानक आकाशातून पडले दगडाचे तुकडे, भंडार्‍यात उल्का वर्षाव झाल्याचा संशय, नेमकं सत्य काय?
Bhandara Ulka NewsSaam Tv
Published On
Summary
  • भंडाऱ्यात आकाशातून दोन रहस्यमयी दगडाचे तुकडे पडले

  • परसोडी परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

  • तुकडे जळत खाली येताना दिसल्याचा दावा

  • उल्का असल्याचा अंदाज

शुभम देशमुख, भंडारा

भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परसोडी परिसरात आकाशातून दोन रहस्यमयी दगडाचे तुकडे पडल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, हे तुकडे 'उल्का' असावेत, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १० जानेवारी रोजी सायंकाळी ७:०० ते ७:१५ वाजेच्या दरम्यान घडली. परसोडी गावाजवळील एका मोकळ्या ले-आउटमध्ये काही मुले शेकोटी पेटवून थंडीपासून संरक्षण करत बसली होती. अचानक आकाशातून काहीतरी जळत खाली येत असल्याचे मुलांच्या निदर्शनास आले. काही क्षणातच सिमेंटच्या रंगाचे दोन तुकडे वेगाने जमिनीवर पडले.

Bhandara : अन् अचानक आकाशातून पडले दगडाचे तुकडे, भंडार्‍यात उल्का वर्षाव झाल्याचा संशय, नेमकं सत्य काय?
Municipal Election : "आमचं ठरलंय! कमळाऐवजी कपाट चिन्ह..." केडीएमसी निवडणुकीत सोशल मीडियावर खोडसाळ प्रचार, नेमकं प्रकरण काय?

सुदैवाने, हे तुकडे मुलांपासून काही अंतरावर पडल्याने मोठी दुर्घटना टळली.हे तुकडे दिसायला सिमेंटसारख्या राखाडी रंगाचे आहेत. विशेष म्हणजे, त्यांचे वजन अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी (हलके) असल्याचे सांगण्यात येत आहे.पडताना हे तुकडे पेट घेत असल्यासारखे दिसत होते, मात्र जमिनीवर आदळल्यानंतर मोठा आवाज झाला नाही.

Bhandara : अन् अचानक आकाशातून पडले दगडाचे तुकडे, भंडार्‍यात उल्का वर्षाव झाल्याचा संशय, नेमकं सत्य काय?
Crime News : धक्कादायक! मामा कामावर गेला, मामीने संधी साधली, भाच्यावर लैंगिक अत्याचार केले अन्...

स्थानिक नागरिक किशोर वाहने यांनी या घटनेची माहिती जवाहरनगर पोलिसांना दिली आणि ११ जानेवारी रोजी हे दोन्ही तुकडे कायदेशीर प्रक्रियेसाठी पोलिसांच्या स्वाधीन केले.खगोलीय अभ्यासकांच्या मते, हे तुकडे अवकाशातून आलेली उल्का असू शकतात. मात्र, त्यांचे वजन हलके असल्याने ते नैसर्गिक उल्का आहेत की मानवनिर्मित अंतराळ कचरा याचा शोध घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com