Nana Patole : सरकारला सत्तेचा माज, यामुळेच राज्यात अराजकता पसरतेय; नाना पटोलेंचा राज्य सरकारवर निशाणा

Bhandara News : महाराष्ट्रातील जनतेच्या मनात असलेला राग सत्तेत असलेल्या सरकारच्या विरोधात आलेला आहे. खरंतर थोडे काही वाटत असेल तर, या कृषिमंत्री कोकाटेंचा राजीनामा घेतला पाहिजे
Nana Patole
Nana PatoleSaam tv
Published On

शुभम देशमुख 
भंडारा
: बेईमानीने निवडून आले आणि सत्ता स्थापन केली. मात्र या सरकारला सत्तेचा माज आला आहे. त्यांचा हा माजचं राज्यात अराजकता फैलावत आहे. आम्ही व आमचे नेते राहुल गांधी सातत्याने सांगतात आहे. हे जनमतानं निवडून आलेले नाहीत आणि त्याचाचं हा माज असल्याचे सांगत काँग्रेसचे नेते तथा आमदार नाना पटोले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. 

भंडारा येथे आले असता नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारवर निशाणा साधला असून कृषिमंत्री कोकाटे यांच्या रमी गेम खेळण्याबाबत देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले कि, आज राज्याचा कृषिमंत्री विधानसभेत जर रमी गेम खेळत असेल, या गावचा कृषिमंत्री ओसाळ गावची पाटीलकी म्हणत असेल तर, मग सरकारची नियत काय आहे. शेतकऱ्यांप्रती हे तिथं सिद्ध झाले असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे. 

Nana Patole
Thane Police : ठाण्यात १ कोटी ६९ लाख किंमतीचे एमडी ड्रग्स जप्त; मुंब्रा बायपास मार्गावर पोलिसांची कारवाई

सरकारने कोकाटेंचा राजीनामा घ्यावा 

शिवाय काल शेतकरी आणि छावा संघटनेचे पदाधिकारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष तटकरे यांच्याकडे गेले. त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी मारहाण केली; हे राज्यातील जनतेनं उघड्या डोळ्यांनी पाहिलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात असलेला राग सत्तेत असलेल्या सरकारच्या विरोधात आलेला आहे. खरंतर थोडे काही वाटत असेल तर, या कृषिमंत्री कोकाटेंचा राजीनामा घेतला पाहिजे आणि आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत अशी भूमिका सरकारनं व्यक्त केली पाहिजे. 

Nana Patole
Crime News : नालासोपाऱ्यात 'दृश्यम'; बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याची हत्या, घरातच पुरला मृतदेह, असा झाला उलगडा

सरकारने कृषिमंत्री कोकाटे यांचा तातडीनं राजीनामा घ्यावा आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांचे जे नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाले आहे. त्याचा मोबदला सरकारने तातडीने द्यावा व पीक विम्याचे पैसे द्यावे. त्यांनी जो आता सुधारणा आणली आहे, त्यात शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणारच नाही. म्हणून शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळेल असं धोरण आणावं; अशी भूमिका आमची असल्याची प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com