उपचारासाठी आलेल्‍या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे; डॉक्‍टर पोलिसांच्‍या ताब्‍यात

उपचारासाठी आलेल्‍या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे
Bhandara News
Bhandara NewsSaam tv
Published On

भंडारा : वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीशी ॲक्युप्रेशर व नॅचरोपॅथी तज्ज्ञ डॉक्टरने (Doctor) अश्लिल चाळे करण्याचा प्रकार तुमसर येथील विनोबानगरात उघडकीस आला. याबाबत तुमसर पोलीस (Police) ठाण्यात बुधवारी सायंकाळी तक्रार दिल्यानंतर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवून अटक केली. दरम्यान आरोपी डॉक्टरची रवानगी भंडारा (Bhandara) कारगृहात करण्यात आली आहे. विजय भैय्यालाल डहाळे (रा. विनोबानगर तुमसर) असे अटकेतील डॉक्टरचे नाव आहे. (Bhandara News Doctor Arrested)

Bhandara News
Jalgaon: शालेय विद्यार्थ्यांना बनावट पासची विक्री; पोलिसात गुन्‍हा दाखल

आरोपी विजय भैय्यालाल डहाळेचे तुमसरात विनोबानगरात ॲक्युप्रेशर व नॅचरोपॅथी दवाखाना आहे. शालेय कवायती आणि धावण्याच्या सरावाने अल्पवयीन मुलगी कंबर आणि पायाच्या दुखण्याने त्रस्त होती. ती 13 ऑगस्टला उपचारासाठी डॉ. विजय डहाळे यांच्याकडे गेली होती. तपासणी कराताना डॉक्टरने अश्लील चाळे केले. या प्रकाराची माहिती मुलीने कुटुंबीयांना सांगितली असता बुधवारी सायंकाळी तुमसर ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांनी तपास करून डॉक्टरविरुद्ध भादंविच्या कालमांसह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे.

१४ दिवसांची न्‍यायालयीन कोठडी

डॉक्टरला तात्काळ अटक करण्यात आली. गुरूवारी डॉक्टरला न्यायालयापुढे हजर केले असता त्याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात उपनिरिक्षक रूपेश कुंभरे करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com