Bhandara: मॉर्निंग वॉकला गेलेल्या वृद्धावर अस्वलाचा हल्ला; प्रकृती चिंताजनक

मॉर्निंग वॉकला गेलेल्या वृद्धावर अस्वलाचा हल्ला; प्रकृती चिंताजनक
Bear Attack
Bear AttackSaam tv
Published On

भंडारा : मॉर्निंग वॉकला गेलेल्या वृद्धावर अस्वलाने अचानक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना (Bhandara) भंडारा तालुक्यातील कोका अभयारण्यालगत ढिवरवाडा ते मांडवी दरम्यान घडली. या हल्ल्यात वृद्धाच्‍या डोक्यावर व पायांवर खोलवर इजा होऊन गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी (Nagpur) नागपूर येथे रवाना करण्यात आले आहे. (Bhandara News Bear attacks)

Bear Attack
अपघाताचा बनाव करत उद्योजकाला लुटले

कोदू तुकाराम हिंगे (वय 65, रा. ढिवरवाडा) असे जखमीचे नाव आहे. हिंगे हे सकाळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला ढिवरवाडा ते मांडवी रस्त्यावर गेले होते. यावेळी अचानक एका अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. मात्र परिसरात कुणीच नसल्याने ते रस्त्यावर पडून होते. काही वेळानंतर या घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळाली असता त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनेची माहिती कोका वन्यजीव अभयारण्यातील अधिकारी तसेच तुमसर वन अधिकाऱ्यांना दिली.

प्रकृती चिंताजनक

मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांना भंडारा जिल्हा रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी आणण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्‍याने डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यास नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले. तेथे कोदू हिंगे यांच्यावर उपचार सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com