Bhandara News : जनता पुराने त्रस्त; पाहणी करायला आलेली नेतेमंडळी स्टंटबाजीत व्यस्त; गोंदियात भाजप आमदाराच्या कृतीने संताप, VIDEO

MP Prashant Padole And BJP MLA Vijay Rahangdale Stunt : गोंदिया जिल्ह्यामध्ये पूरस्थितीची पाहणी करायची सोडून नेतेमंडळी रिल्स बनवण्यात व्यस्त असल्याचं दिसतंय. काँग्रेस खासदारांनंतर आता भाजप आमदाराने देखील स्टंटबाजी करत रील्स बनवल्याचं समोर आलंय.
नेतेमंडळी स्टंटबाजीत व्यस्त
BJP MLA Vijay Rahangdale StuntSaam Tv
Published On

शुभम देशमुख, साम टीव्ही गोंदिया

गोंदिया जिल्ह्यात पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या काँग्रेस खासदारांनंतर आता भाजप आमदाराने देखील स्टंटबाजी केल्याचं समोर आलंय. खासदाराने चारचाकी वाहनावर तर आमदाराने थेट ट्रॅक्टरवर बसून स्टंटबाजी केलीय, हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे आता भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील राजकीय नेत्यांना झालंय तरी काय? असा प्रश्न निर्माण झालाय.

पूर (Flood) परिस्थितीची पाहणी दरम्यान स्टंटबाजीमध्ये त्यांनी अधिक रस दाखवल्याचं समोर आलंय. शेतकरी उध्वस्त झालं असताना आमदार महोदय रस्त्यावरून नागरीकांना हात दाखवून स्मितहास्य करत असल्याचं (Bhandara News) दिसतंय.

नेतेमंडळी स्टंटबाजीत व्यस्त

गोंदिया जिल्ह्यातील पूल परिस्थितीत एकीकडे शेतकरी संकटात आहे, कितीतरी घरे जमीनदोस्त झाली आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नेतेमंडळीकडून शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा (BJP MLA Vijay Rahangdale Stunt) असते. मात्र, नेतेमंडळी सोशल मीडियावर रिल्स बनवण्यात व्यस्त दिसत आहे. तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले यांनी सुद्धा हा नाद काही आवरत नसल्याचं दिसलंय. त्यांनी चक्क जेसीबीवर बसून स्टंटबाजी केली.

काल काँग्रेसचे खासदार प्रशांत पटोळे यांच्या रिल्स तयार करणारा व्हिडिओ चांगलाच वायरल झाला होता. यावर जनतेची तिखट प्रतिक्रिया बघायला मिळाली. आता तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार विजय रहांगडाले यांच्या सुद्धा जेसीबीवर (Stunt Video) बसून एक स्टंटबाजी करत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. एकीकडे शेतकरी उध्वस्त झालाय. त्याच्या शेतावर पाहणी करायची सोडून आमदार महोदय रस्त्यावरून नागरीकांना हात दाखवून स्मितहास्य करत आहेत.

नेतेमंडळी स्टंटबाजीत व्यस्त
Stunt Video : रीलचा नाद जाईना!किल्ल्याच्या टोकावरुन तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी;पाहा धक्कादायक VIDEO

भाजप आमदाराच्या कृतीने संताप

आमदार महोदय शेतकऱ्यांची भावनांशी खेळत असल्याचा देखील, जनतेकडून आरोप केला जातोय. पूरग्रस्त नुकसानीचा आढावा घ्यायचा सोडून आमदार महोदय प्रचार करत असल्याचं (stunt In Flood) दिसतंय. जिल्ह्यात पूर परिस्थिती असताना कसा काय आमदार, खासदार अशा प्रकारचे रिल्स तयार करतात? त्यांच्या संवेदना मेल्या की काय? असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय. आमदार विजय रहांगडाले यांच्या या व्हिडिओनंतर नागिरकांमधून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होतोय.

नेतेमंडळी स्टंटबाजीत व्यस्त
Akshay Kumar Stunt: रिस्क, दुखापत पण मागे न हटला, बॉलिवडूच्या खिलाडीचा स्वॅग न्यारा, वाचा अक्षय कुमारच्या स्टंटबद्दल माहित नसलेल्या गोष्टी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com