शुभम देशमुख; प्रतिनिधी...
Bhandara Crime News: ४२ वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. भंडाऱ्याच्या कारधा पोलिस स्टेशन हद्दीतील बासोरा येथे घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून नराधम आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Crime News in Marathi)
याबाबत अधिक माहिती अशी की, भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या कारधा पोलिस स्टेशन हद्दीतील बासोरा (Basora) येथे अल्पवयीन मुलावर केल्याची घटना उघडकीस आली. मुलीचे आई वडील कामानिमित्त बाहेर गेल्याने ती एकटीच घरी होती.
हीच संधी साधून घराशेजारी राहणाऱ्या 42 वर्षीय इसमाने अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यावेळी घाबरलेल्या मुलीने आरडा- ओरडा केल्याने आरोपीने तिथून पळ काढला. मुलीचे आई वडील घरी आल्यानंतर मुलीने सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला. याप्रकरणी वडिलांनी कारधा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.
कारधा पोलिसांनी (Kardha Police Station) घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ आरोपीला अटक केली आहे. आरोपीचे नाव संजय हेलमारे वय वर्ष 42 राहणार बासोरा असे असून पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्ह्या दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.