Bhandara News: हृदयद्रावक! विजेचा धक्का लागून पहिलीतील विद्यार्थिनीचा शाळेतच मृत्यू; भंडारा जिल्ह्यात हळहळ

Bhandara Latest News: नवीन शैक्षणिक सत्रातील तिसऱ्याच दिवशी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतील पहिल्या वर्गात शिकणाऱ्या एका चिमुकल्या विद्यार्थिनीचा विद्युत करंट लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
Bhandara News: हृदयद्रावक! विजेचा धक्का लागून पहिलीतील विद्यार्थिनीचा शाळेतच मृत्यू; भंडारा जिल्ह्यात हळहळ
Bhandara Latest News: Saamtv

शुभम देशमुख, ता. ३ जुलै २०२४

जिल्हा परिषद शाळेत विजेचा करंट लागून पहिल्या वर्गातील विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील पुयार येथे घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Bhandara News: हृदयद्रावक! विजेचा धक्का लागून पहिलीतील विद्यार्थिनीचा शाळेतच मृत्यू; भंडारा जिल्ह्यात हळहळ
Pune Porshe Accident: पोर्शे अपघातातून सुटला, फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकला! विशाल अगरवालला पुन्हा अटक; प्रकरण काय?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नवीन शैक्षणिक सत्रातील तिसऱ्याच दिवशी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतील पहिल्या वर्गात शिकणाऱ्या एका चिमुकल्या विद्यार्थिनीचा विद्युत करंट लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पुयार येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत घडली आहे.

यशस्वी सोपान राऊत (वय ६ वर्ष रा. पुयार) असे मृतक विद्यार्थिनीचे नाव आहे. आज सकाळी दहा वाजेपूर्वी यशस्वी राऊत ही विद्यार्थिनी शाळेत आली. यावेळी शाळेमध्ये लघुशंकेला गेली असता जवळच लावन्यात आसलेल्या RO च्या जिवंत विद्युत तारचा करंट लागला व ती स्वच्छता गृहातच बेशुद्ध पडली.

Bhandara News: हृदयद्रावक! विजेचा धक्का लागून पहिलीतील विद्यार्थिनीचा शाळेतच मृत्यू; भंडारा जिल्ह्यात हळहळ
PM Narendra Modi Speech: 'खोट पसरवणाऱ्यांना सत्य ऐकू येत नाही', विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर PM मोदींचा टोला!

शाळेतील शिक्षकांनी तात्काळ यशस्वीला लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र येथील डॉक्टरांनी तिला उपचाराआधीच मृत घोषित केले. शाळा सुरू होऊन अवघे तीन दिवस झाले असतानाच घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. लाखांदूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Bhandara News: हृदयद्रावक! विजेचा धक्का लागून पहिलीतील विद्यार्थिनीचा शाळेतच मृत्यू; भंडारा जिल्ह्यात हळहळ
Nanded Crime : भाजप पदाधिकाऱ्याचा ठाकरे गटाच्या माजी नगराध्यक्षावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com