Accident : महामार्गावर काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; कारची दुचाकीला धडक, दोघांचा जागीच मृत्यू

Bhandara Accident News : भंडारा-पवनी महामार्गावर भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातानंतर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
Accident : महामार्गावर काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; कारची दुचाकीला धडक,  दोघांचा जागीच मृत्यू
Bhandara Accident NewsSaam Tv
Published On
Summary
  • भंडारा-पवनी महामार्गावर भीषण अपघात

  • भरधाव कारने दुचाकीला दिली जोरदार धडक

  • दोन तरुणांचा मृत्यू, कुटुंबावर शोककळा

  • चालकाविरुद्ध गुन्हा दाखल, अटक

  • पोलिसांकडून पुढील तपास सुरू

शुभम देशमुख, भंडारा

भंडारामधून मोठी बातमी समोर आली आहे. भंडारा - पवनी महामार्गावरील कोंढा इथे भीषण अपघात घडला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडल्याचे म्हटले जात आहे. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये दुचाकीचा चक्काचूर झाला. याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली असून या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच अपघातात मृत झालेल्या तरुणांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रफुल आखरे (वय ३०) आणि मोरेश्वर सावरबांधे (वय ३५) असं मृत तरुणांचं नावं आहे. प्रफुल आखरे आणि मोरेश्वर सावरबांधे हे दोघे दुचाकीवरून कोंढा गावाकडून अड्याळकडे जात होते. याचदरम्यान पवनीकडून भंडाऱ्याच्या दिशेनं भारधाव आलेल्या चारचाकी वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. यानंतर चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात कोसळली ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा चक्काचूर झाला.

Accident : महामार्गावर काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; कारची दुचाकीला धडक,  दोघांचा जागीच मृत्यू
Shocking : भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल, राजकारणात मोठी खळबळ

या अपघातात दुचाकीवरून जाणारे प्रफुल आखरे आणि मोरेश्वर सावरबांधे हे गंभीर जखमी झाले. अपघातात मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने प्रफुल आखरे यांचा जागीच मृत्यू झाला तर, मोरेश्वर सावरबांधे यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. या अपघातात चारचाकी वाहनातील चालकाला किरकोळ जखम झाली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला अटक करण्यात आली आहे.

Accident : महामार्गावर काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; कारची दुचाकीला धडक,  दोघांचा जागीच मृत्यू
Political News : ऐन निवडणुकीच्या काळात बड्या नेत्यानं सोडली भाजपची साथ; तृणमूल काँग्रेसमध्ये केला प्रवेश

मुंबई गोवा महामार्गावर अपघात

गोव्याच्या दिशेने खडी वाहतूक करणाऱ्या डंपरचा टायर फुटल्याने तो दुभाजक तोडून पलटी झाला. या अपघातात डंपर चालक थोडक्यात बचावला, मात्र डंपरमधील खडी रस्त्यावर सर्वत्र पसरल्याने काहीवेळ वाहतूकीचा खोळंबा झाला. मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवर मळगांव जोशी - मांजरेकरवाडी येथे हा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी चालकाला डंपरच्या केबिनमधून सुरक्षित रित्या बाहेर काढले. या नंतर जेसीबीच्या मदतीने रस्त्यावरील खडी बाजूला काढण्यात आली. त्यामुळे खोळंबलेली वाहतूक काही वेळानंतर सुरळीत झाली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर अपघातग्रस्त डंपर बाजूला करण्यात आला.

Accident : महामार्गावर काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; कारची दुचाकीला धडक,  दोघांचा जागीच मृत्यू
Mumbai : टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या सासऱ्यांसह तिघांना अटक, मुंबई पोलिसांची कारवाई; नेमकं कारण काय?

वाशिममध्ये भरधाव ट्रकची एसटी बसला धडक

वाशिमच्या रिसोड तालुक्यातील सरपखेड - मेहकर मार्गावर भरधाव ट्रकची एसटी बसला समोरासमोर धडक देत अपघात झाल्याची घटना घडलीये. या अपघातात एसटी चालक आणि ट्रक चालकासह 5 ते 6 प्रवासी जखमी झाले असून, त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातानंतर स्थानिक गावकऱ्यांनी अपघात ग्रस्तांना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल केले असून,पुढील तपास रिसोड पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com