राजकीय वर्तुळात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राज्यातील महायुतीमध्ये अनेक जागांवरुन रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे. अशातच आता छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरही भारतीय जनता पक्षाने दावा केल्याने शिवसेना शिंदे गटाची धाकधुक वाढली आहे.
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाने जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणुकीसाठी मी स्वतः इच्छुक असल्याचे सांगत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी या जागेवर दावा केला आहे. छत्रपती संभाजीनगर या जागेवर यापूर्वीच शिवसेनेने दावा सांगितला असतानाच, आता भाजपानेही ही जागेवर दावा केल्याने महायुतीमध्ये चुरस वाढली आहे.
डॉक्टर भागवत कराड (Bhagwat Karad) आज पंढरपूरला श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाने तयारी सुरू केली आहे. या मतदारसंघातून निवडणुकीसाठी मी स्वतः इच्छुक आहे.परंतु अद्याप वरिष्ठ पातळीवरून उमेदवारी संदर्भातील कोणताही निर्णय झालेला नाही, महायुतीचे नेते एकत्रित बसून या जागेचा तिढा सोडवतील अशी अपेक्षाही मंत्री कराड यांनी व्यक्त केली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या उमेदवारीवरूनही भाजप आणि शिंदे गट दावे-प्रतिदावे करत आहेत. सोशल मीडियावर दोन्हीकडून गटाकडून दबावाचं राजकारण सुरु आहे. अशातच आता मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या समर्थकांकडूनरत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघावर दावा सांगणारे स्टेटस ठेवले जात आहेत. त्यामुळे ही जागा कोणाला जाणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.