Inspirational Story: बीडच्या महिलांचे कौतुक करावे तितके कमीच... ट्रॅक्टर चालवण्यापासून ते पिक घेण्यापर्यंत करतात सर्व कामे

Inspirational Story Of Beed Women Group: बीडमध्ये ११ कुटुंबातील महिलांनी एकत्र येत नवीन उपक्रम केला आहे. त्यांनी शेतीतील सर्व कामे एकट्याने केली आहेत.
Inspirational Story
Inspirational StorySaam Tv
Published On

बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील देवळा गावातील महिलांनी शेती क्षेत्रात एक अनोखी क्रांती घडवून आणली आहे. या गावातील 11 कुटुंबातील महिलांनी एकत्र येत गटाची स्थापना केली आणि त्या शेतीतील सर्व कामे स्वतः करू लागल्या. बीजे प्रक्रिया ते काढणीपर्यंतच्या सर्व कामांमध्ये त्या प्राविण्य मिळवलेल्या आहेत. ट्रॅक्टर फवारणी यासारख्या विविध कामांमध्ये त्या एकमेकाला मदत करतात.

Inspirational Story
Success Story: IIT मधून इंजिनियरिंग, ९ ते ५ नोकरी करत पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS नेहा बॅनर्जी यांचा प्रेरणादायी प्रवास

बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील देवळा गावच्या या महिला रहिवासी आहेत. 11 महिलांनी एकत्र येत ऑरगॅनिक ग्रामीण किसान शेतकरी गटाची स्थापना केली आणि या गटाच्या माध्यमातून त्या एकमेकींच्या शेतीत सांगड पद्धतीने काम करत आहेत. नांगरणी, पेरणी, खुरपणीसह आदी कामे सांगड पध्दतीने करत असल्याने त्यांच्या पैश्याची देखील बचत होत आहे.. विशेष म्हणजे ट्रॅक्टर चालवण्यापासून सर्व कामे या महिला करतात.

कृषी विज्ञान केंद्र, पाणी फाउंडेशन आणि कृषी विभागाकडून या महिलांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. गटाच्या महिला बैठकीच्या माध्यमातून एकत्र येऊन सर्वांच्या सुख दुःखात सामील होतात....योगिता खामकर सांगतात की मी शेतात मध्ये खूप काम करायचे मात्र माझे पती त्या कामाबद्दल अभिमान बाळगत नसत मात्र मी गट शेतीच्या महिलांसोबत आल्यास माझं मन मोकळं झालं आणि मला सन्मान मिळू लागला...

Inspirational Story
Success Story: लहानपणी कामाचे १० रुपये मिळायचे, दोन वेळचे जेवण नव्हते, पठ्ठ्याने हार मानली नाही, आधी पोलिस कॉन्स्टेबल ते आता IAS अधिकारी

या महिलांचे एकीकरण समाजातील इतर महिलांना निश्चित प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या यशाने इतर गावातील महिलांनाही अशा प्रकारचे गट तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत असून. यामुळे गावातील महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे, असा विश्वास आता वर्तवला जात आहे.

Inspirational Story
Success Story : डॉक्टर झाल्या, पण चैन पडेना...तिसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IFS अपाला मिश्रा यांचा प्रेरणादायी प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com