Beed News : मोठी बातमी! बीड जिल्ह्यात आजपासून मनाई आदेश लागू, कारण काय?

Beed News update : बीडमधून मोठी बातमी हाती आली आहे. बीड जिल्ह्यात आजपासून मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. वाचा काय आहे कारण?
beed Latest News
beed News Saam tv
Published On

योगेश काशिद, साम टीव्ही

बीड जिल्हा संतोष देशमुख प्रकरणामुळे चांगलाच गाजत आहे. गेल्या काही महिन्यांत बीडमध्ये गंभीर गुन्हे घडले आहेत. यापार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट झालं आहे. जिल्ह्यात निदर्शने,आंदोलने, उपोषण आणि मोर्चे होण्याच्या पार्श्वभूमीवर आजपासून मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. यामुळे बीड जिल्ह्यात २ एप्रिलपर्यंत मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.

सध्या जिल्ह्यात राजकीय नेत्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. तसेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे दोन गटात वाद होण्याची शक्यता आहे.याच अनुषंगाने जिल्ह्यात निदर्शन, आंदोलन, उपोषण, मोर्चे होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर हा मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्याकडून हे मनाई आदेश जारी करण्यात आलेत. 19 मार्च रात्री बारापासून ते 2 एप्रिल पर्यंत हे आदेश लागू असतील. परिस्थिती लक्षात घेऊन यात वाढ देखील होण्याची शक्यता आहे. या आदेशानुसार मोर्चे निदर्शने आंदोलने परवानगीशिवाय एकत्र येण्यास निर्बंध असतील.

beed Latest News
Pune Crime : धक्कादायक! घरगुती सिलिंडरमधून छोट्या सिलिंडरमध्ये भरायचे गॅस; पोलिसांनी रॅकेटचा असा केला पर्दाफाश
beed Latest News
Nagpur Clash : हिंसेचं समर्थन नाही; नागपुरातील हिंसाचारावरून आरएसएसने टोचले विहिंपचे कान

बीड जिल्ह्यात विद्यार्थ्याच्या परीक्षा देखील सुरु आहेत. यामुळे किरकोळ कारणावरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठीही सर्व समाज आणि राजकीय पक्ष आक्रमक आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार, प्रतिबंधात्मक आदेशामध्ये मोर्चे, निदर्शने, आंदोलने, धरणे या सारखे आंदोलनामध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगीशिवाय एकत्र येता येणार नाही.

beed Latest News
Dombivli : डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारत प्रकरणी कारवाईला वेग; खोटे कागदपत्र तयार करणाऱ्याला बसला पहिला दणका?

जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. प्रतिबंधात्मक (मनाई) आदेश लागू केल्यानंतर व्यक्तीला जवळ शस्त्र, सोटे, काठी, तलवार, बंदूक जवळ बाळगता येणार नाही. त्याचबरोबर लाठ्या, काठ्या, शारीरिक इजा होण्यास कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील, अशा वस्तू, साहित्य बाळगणार नाहीत. कोणतेही दाहक पदार्थ किंवा स्फोटके जवळ बाळगता येणार नाहीत. बीडमधील व्यक्तीला दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा फोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे गोळा करता येणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com