Beed Crime: लग्नाची भूलथाप अन् आरोपीचा घाणेरडा खेळ; माजलगावात २० वर्षीय तरूणीवर अत्याचार, पीडिता गर्भवती

Beed latest crime: बीडच्या माजलगावात २० वर्षीय तरुणीवर लग्नाची भूलथाप देत वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. तरूणी ५ महिन्यांची गर्भवती असल्यामुळे हे प्रकरण उघडकीस आलं.
rape case
rape caseSaam Tv News
Published On

बीडमध्ये सध्या गुन्हेगाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच बीडमधून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. लग्नाची भूलथाप देत तरूणीवर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. तरूणीची वैद्यकीय तपासणी केली असता पीडित तरूणी गर्भवती असल्याचं समोर आलं. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

बीडच्या माजलगावातून ही संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना मे महिन्यात उघडकीस आली. वीस वर्षीय तरूणीची आरोपी सुनील अलजेंडेसोबत मैत्री झाली होती. दोघांमध्ये वारंवार संवाद होत होता. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. नंतर आरोपीने तिचं विश्वास संपादन करीत आपल्या जाळ्यात ओढलं. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवला.

rape case
Shivsena: ठाकरेंचा बालेकिल्ला ढासळणार? भास्कर जाधवांना टक्कर देण्यासाठी शिंदेंचा शिलेदार मैदानात

सुरूवातीला लग्नाचे आश्वासन दिल्यानं तरूणीने लग्न करण्यास नकार दिला. मात्र जेव्हा तरूणीने विचारण्यास सुरूवात केली, तेव्हा आरोपीने लग्न करण्यास नकार दिला. मे महिन्यात तरूणीला अस्वस्थ वाटू लागलं. पीडितेच्या वारंवार पोटात दुखू लागलं होतं. पोटात दुखू लागल्यामुळे पीडितेच्या कुटुंबाने तिला दवाखान्यात नेले.

खासगी रूग्णालयात तपासणीसाठी नेले असता डॉक्टरांनी पीडित तरूणी गर्भवती असल्याचं सांगितलं. ती सुमारे ५ महिन्यांची गर्भवती असल्याचं समोर आलं आहे. हे एकून कुटुंबाने लगेच याबद्दल माहिती दिली. नंतर तातडीने त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. कुटुंबाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सुनीलच्या विरोधात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

rape case
Santosh Deshmukh: संतोष देशमुख हत्याकांडाला अर्धा वर्ष झालं, तरी आरोपी फरार; कृष्णा आंधळे कुठे लपला?

आरोपी सुनिलने पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केलं असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच आरोपीविरोधात रोष व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com