बीड जिल्ह्यातील लालपरी सुसाट धावत असल्याचं पाहायला मिळत असून बीड विभाग मागील 8 महिन्यांपासून उत्पन्नात आघाडीवर आहे. डिसेंबर अखेर 13 कोटी 34 लाख रुपयांचा नफा बीड विभागाने मिळविला आहे. राज्यात हा विभाग दुसऱ्या स्थानावर आहे. तर संभाजीनगर विभागात बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई आगार पहिल्या स्थानावर आहे.
एप्रिल 2023 पासून लग्नसरई, सुट्यांमुळे गर्दीचा हंगाम राहिला. आषाढीनिमित्त पंढरपूर, श्रीक्षेत्र नारायणगड, श्रावणात कपिलधार, परळी वैद्यनाथ, गणेशोत्सवात कोकण, तसेच पर्यटन, यात्रेसाठी समूहाने जाणाऱ्या प्रवाशांसाठी बस सुविधा, विविध राजकीय कार्यक्रम, मेळावे, सभांसाठी बसची मागणी राहिली.
विभागातून दररोज 500 फेऱ्यांतून प्रवाशांना सुविधा दिल्या जात आहेत. शासनाने जाहीर केलेल्या अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत मोफत प्रवास सेवा, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला सन्मान योजनेअंतर्गत प्रवास भाड्यात 50 टक्के सवलतीमुळे 'रापम'च्या बसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली आहे. यामुळे बीड विभागातील सर्वच आगारांच्या उत्पन्नात भर पडली आहे.
30 एसटी बसेस भाविकांच्या सेवेसाठी
परभणीचे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेले हजरत सय्यद शहा तूराबूल हक रहे यांचा 15 दिवस चालणाऱ्या ऊरुस यात्रे निमित्त परभणी आगारातुन शहरात 30 एसटी बसेस भाविकांच्या सेवेसाठी धावणार आहेत. बस स्थानकापासून दर्ग्यापर्यंत तिकिटाचा दर दहा रुपये असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.