Suresh Dhas : सतीश भोसलेला मी ओळखतो, पण तो पाठीमागे...; सुरेश धस 'खोक्या'बाबत स्पष्टच बोलले

Suresh Dhas on Satish Bhosale : सतीश भोसले याला मी ओळखतो. तो कधी कधी माझ्याकडे येतो. पण तो पाठीमागे असे काही उद्योग करतो हे थोडीच मला माहिती आहे. शंभर टक्के त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे.
Satish Bhosale Marathi news
Satish Bhosale Marathi newsSaam Tv News
Published On

मुंबई : बीडमधील मस्साजोग दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडच्या शिरुरमधील एक संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले एका व्यक्तीला बेदम मारहाण करताना दिसत आहे. ज्यानंतर मोठी खळबळ निर्माण झाली आहे. यासोबतच सतीश भोसले याचा अजून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात तो त्याच्या कारमध्ये नोटांचे बंडल फेकत असल्याचं दिसत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओनंतर जोरदार टीका केली जात आहे. यावर सुरेश धस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सुरेश धस हे म्हणाले की, सतीश भोसले याला मी ओळखतो. तो कधी कधी माझ्याकडे येतो. पण तो पाठीमागे असे काही उद्योग करतो हे थोडीच मला माहिती आहे. शंभर टक्के त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. मी अगोदर हे सांगू इच्छितो की, हा व्हायरल होणारा व्हिडीओ आताचा नाही तर दीड वर्षे जुना आहे. तो बॉस समजतो म्हणून काय झाले. मीच बॉस म्हणून सांगतो त्याच्याविरोधात कारवाई झाली पाहिजे. महिलेच्या छेडीवरून ही घटना घडल्याची माहिती मिळाल्याचे सुरेश धस यांनी यावेळी म्हटलं आहे.

Satish Bhosale Marathi news
Palghar Boat Accident : मासेमारी करायला गेले, १६ दिवसांनी परतत होते; समुद्राने चौघांना गिळलं

सतीश भोसले याच्याविरोधात आता गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. व्हिडीओमध्ये मारहाण करणारा सतीश भोसले हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याने त्यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे. आता यावर स्पष्ट भूमिका ही सुरेश धस यांनी घेतली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सतीश भोसले याचा गाडीतील व्हिडीओ हा सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करत काही प्रश्नही उपस्थित केले.

Satish Bhosale Marathi news
Jaykumar Gore: या सर्व त्रासाला कंटाळून मी...मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेने सर्वकाही सांगितलं, EXCLUSIVE

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com