Jaykumar Gore: या सर्व त्रासाला कंटाळून मी...मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेने सर्वकाही सांगितलं, EXCLUSIVE

Jaykumar Gore Controversy: जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेने साम टीव्हीशी बोलताना त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं हे सर्वकाही सांगितले.

राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर सध्या एका महिलेकडून गंभीर आरोप होत आहेत. या आरोपांचे पडसाद सध्या विधानसभेमध्ये उमटत आहेत. या महिलेने जयकुमार गोरे यांनी त्यांना वारंवार त्रास दिल्याचा आरोप केला आहे. 'जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यांकडून वारंवार माझी बदनामी केली जात आहे. त्यामुळे या सर्व त्रासाला कंटाळून १७ मार्च २०२५ला मी मुंबई येथे राजभवनला अमरण उपोषणाला बसणार आहे', असा इशारा या महिलेने दिला आहे. या महिलेने साम टीव्हीशी बोलताना जयकुमार गोरे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत.

पीडित महिलेने जयकुमार गोरेंवर आरोप करताना सांगितले की, 'हे प्रकरण २०१५-१६ चे आहे. जयकुमार गोरे यांनी मला मानसिक त्रास दिला. वेगवेगळे इमेजेस आणि मेसेज पाठवून त्रास दिला. त्यांच्या मागणीला भीक न घालता मी तटस्थ राहिले त्यामुळे त्यांनी व्हॉट्सअपवर मला आणि माझ्या आईला शिव्या दिल्या होत्या. माझी अपेक्षा ऐवढीच आहे की दोन वाक्यात माफी मागा की तुम्ही चुकला आहात आणि यापुढे असं करणार नाही. त्यांनी ऐवढे फक्त लिहून माफी मागितली असती तर आता जे चालू आहे ते काहीच झाले नसते.'

पीडित महिलेने पुढे सांगितले की, '२७ नोव्हेंबर २०१६ ला त्यांच्याविरोधात मी एफआयआर दाखल केली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय आणि सातारा जिल्हा न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर १० दिवस ते जेलमध्ये होते. जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी माझ्यावर दोन खोट्या खंडणीच्या केस दाखल केल्या. त्यांनी माझ्यावर केस यासाठी केली की त्यांच्यावर विनयभंगाची केस करणारीचे नाव समोर यावे. त्यानंतर ३ वर्षे मला त्रास देणं सुरू होते. धमक्या येणे, घाणेरडे फोन येणं हे सुरूच होते. २०१९ ला निवडून आल्यानंतर पुन्हा शपथविधीसाठी या केसचा प्रॉब्लेम होत होता. त्यामुळे माझ्या भावाला संपर्क करून त्यांच्या वकिलांनी माझ्यावर प्रेशर आणला.'

तसंच, 'माझ्या भावाने माझी मदत केली. आपल्याला यामध्ये पडायचे नाही आणि झाले ते खूप आहे तू केस मागे घे. त्याप्रमाणे मी ठिक आहे म्हणत कोर्टात गेले. पण कोर्टात गेल्यानंतर मला थोडसं आठवले आणि मला त्यांच्याकडून माफीनामा हवा आहे तरच मी केस मागे घेईल असे म्हटले. त्यावेळी त्यांनी कोर्टाच्या चेंबरमध्ये मला साष्टांग दंडवत घातला होता. त्यानंतर त्यांनी मला माफीनामा लिहून दिला होता. त्यानंतर आजपर्यंत माझ्यावर त्यांनी अनेक आरोप केलेत. माझ्या कानावर अनेकदा आले की मी तिला पुण्यात, मुंबईत फ्लॅट दिला. दुबईला गेले होते असे म्हटले आहे. पण माझा पासपोर्ट देखील नाही.' , असं त्या म्हणाल्या.

सतत होणाऱ्या त्रासाचा उल्लेख करत त्या म्हणाल्या की, '४ महिन्यांपूर्वी मी त्यांच्याविरोधात एक एफआयआर केली होती ती व्हॉट्सअपवर फिरत होती. पण एका सज्जन माणसाने ती एफआयआर काढायला लावली. त्यानंतर ९ जानेवारीचे पत्र मला २० जानेवारीला मिळाले त्यामध्ये २०१६ च्या केसचा उल्लेख केला होता. माझा पत्ता देखील त्यावर होता. मी २६ जानेवारीला उपोषणाला बसणार आहे असे देखील लिहिले होते. मी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सांगितले की मी हे केले नाही हे पत्र सगळीकडे फिरत आहे. मी एसपींशी संपर्क करून सांगतो आणि तुमची त्यासंदर्भात दखल घेऊन मदत करतील असे ते म्हणाले पण ते आजपर्यंत झाले नाही.'

जयकुमार गोरेंकडून आपल्यावर प्रचंड दबाव असल्याचे सांगत ही महिला म्हणाली की, 'मला पत्र येते, माझी एफआयआर सगळीकडे फिरते, मेसेज व्हायरल होतात हे सर्व गोरेंचे कार्यकर्ते करतात. पोलिसांना जर का ते सापडले तर बदनामी होईल त्यामुळे याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे ठरवले आहे की या सर्व त्रासाला कंटाळून मी १७ मार्च २०२५ रोजी मुंबईतील राजभवन येथे आमरण उपोषणाला बसणार आहे. २०१९ ला ही केस निकाली निघाली होती. पण त्यानंतर देखील केस मागे घेण्यासाठी त्यांचा माझ्यावर प्रचंड दबाव होता.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com