Beed Politics: ...तर तुम्ही आमच्या पाठीमागे उभे राहा, तिसऱ्या आघाडीच्या उमेदवाराची जरांगेंना साद
Manoj Jarange PatilSaam tv

Beed Politics: ...तर तुम्ही आमच्या पाठीमागे उभे राहा, तिसऱ्या आघाडीच्या उमेदवाराची जरांगेंना साद

Manoj Jarange Patil: तिसऱ्या आघाडीच्या उमेदवार पूजा मोरे यांनी छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या समोर मनोज जरांगे पाटील यांना आवाहन केले आहे. त्या बीडमध्ये आयोजित जाहीर सभेत बोलत होत्या.
Published on

विनोद जिरे, बीड

'आम्ही कधी वाळू खाल्ली नाही... आम्ही कधी गिट्टी खाल्ली नाही...', असं म्हणत तिसऱ्या आघाडीच्या गेवराई विधानसभेच्या उमेदवार पूजा मोरे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. तसंच, तुम्ही आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा.' असे आवाहन त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना थेट आवाहन केले आहे.

'मनोज जरांगे पाटील तुम्ही अनेक वेळा म्हणत होता शेतकऱ्यांची पोरं सभागृहात गेली पाहिजेत. आपल्या शेतकऱ्यांचा आवाज तिथे घुमला पाहिजे. त्यामुळं आता मनोज जरांगे पाटील तुम्ही देखील आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा.', असं आवाहन तिसऱ्या आघाडीच्या उमेदवार पूजा मोरे यांनी छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या समोर केले आहे. त्या बीडमध्ये आयोजित जाहीर सभेत बोलत होत्या.

Beed Politics: ...तर तुम्ही आमच्या पाठीमागे उभे राहा, तिसऱ्या आघाडीच्या उमेदवाराची जरांगेंना साद
Maharashtra Politics : मुंबईत राडा! ठाकरे-शिंदेंचे समर्थक आमनेसामने, दगडफेक अन् मारामारीमुळे वातावरण तापलं!

'अरे आमचं आयुष्य बघा आम्ही कधी वाळू खाल्ली नाही, कधी गिट्टी खाल्ली नाही, उलट आम्ही शेतकऱ्यांसाठी लाट्या काठ्या खात आलो आणि अशी मुलं प्रस्थापितांच्या विरोधांमध्ये संघर्ष करायला पुढे येत असतील तर मनोज जरांगे पाटील तुम्ही सुद्धा आमच्या सारख्या पोरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घ्यावी लागेल. त्यावेळेस या प्रस्थापितांचा वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. नाही तर पुन्हा हे प्रस्थापित आमच्या मानगुटीवर बसल्याशिवाय राहणार नाहीत.', असा घनाघात पूजा मोरे यांनी विरोधकांवर घालत जरांगे पाटलांना आवाहन केलं आहे.

Beed Politics: ...तर तुम्ही आमच्या पाठीमागे उभे राहा, तिसऱ्या आघाडीच्या उमेदवाराची जरांगेंना साद
Maharashtra Politics : राज्यातील 40-42 मतदारसंघात अमराठींचा बोलबाला; परप्रांतीय मतं कोणाचं टेन्शन वाढवणार? वाचा

त्याचबरोबर, 'तुमची लेकबाळ म्हणून तुमच्यासमोर झोळी पसरवून तुमच्यासमोर मताचा जोगवा मागते आणि या लेकीबाळीची झोळी 20 तारखेला भरघोस मतांनी भरवा.', अशी भावनिक साद यावेळी तिसऱ्या आघाडीच्या उमेदवार पूजा मोरे यांनी घातली आहे. सध्या पूजा मोरे यांच्याकडून जोरदार प्रचार केला जात आहे.

Beed Politics: ...तर तुम्ही आमच्या पाठीमागे उभे राहा, तिसऱ्या आघाडीच्या उमेदवाराची जरांगेंना साद
Maharashtra Politics : ये तो ट्रेलर है... मैं खुद की भी नहीं सुनता; डायलॉगमधून एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com