Beed News : बीडमध्ये राजकीय वातावरण तापलं; पोलीस ॲक्शन मोडवर, सोशल मीडिया पोस्टवर असणार करडी नजर

Beed politics News : संतोष हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. या घटनेमुळे पोलीस ॲक्शन मोडवर पाहायला मिळत आहे. या घटनेनंतर सोशल मीडिया पोस्टवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.
police
Beed police Saam Digital
Published On

बीड : बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकरणावरूनही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. या प्रकरणाचं लोण आता सोशल मीडियापर्यंतही पोहोचलं आहे. यानंतर बीड पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. सोशल मीडियावरून दहशत निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल केल्यास अथवा फॉरवर्ड केल्यास कठोर कारवाई करू. तसेच गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी जनतेला आवाहन केलं आहे.

पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी काढलेल्या पत्रात म्हटलं की, जिल्हयातील सर्व जनतेला आवाहन करण्यात येत आहे की, कोणीही मोबाईल आणि इंटरनेटचा वापर करुन आपल्याकडे असलेले वैध अथवा अवैध शस्त्राचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करु नये. तसेच एखाद्या हाणामारीच्या घटनेतील रेकॉर्ड केलेला फोटो व्हिडिओ, शिव्या देतांनाचा व्हिडिओ अथवा समाजात दहशत किंवा भिती निर्माण होईल, अशी कोणतीही पोस्ट कोणत्याही सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर करु नये'.

police
Crime News: बहिणीच्या अंत्यसंस्काराला गेला आणि भावोजीला जळत्या चितेवर फेकला, मेहुण्याचा धक्कादायक प्रताप

'समाजात तेढ निर्माण करणारे मेसेज फॉरवर्ड करु नये. तसेच ज्यांनी कोणी यापूर्वी अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित केल्या असतील, शेअर केल्या असतील किंवा फॉरवर्ड केल्या असतील. त्या त्यांनी तात्काळ सोशल मीडियावरुन डिलीट कराव्यात', असंही त्यांनी सांगितलं.

police
Santosh Deshmukh News : जिकडे पाहावं तिकडे गर्दीच गर्दी, पाय ठेवायलाही जागा नाही, बीडच्या मोर्चात गर्दीचा उच्चांक | VIDEO

'सोशल मीडियावर अशा प्रकारे कोणीही शस्त्राचे, हाणामारीचे अथवा शिवीगाळ किंवा समाजात भीती आणि दहशत निर्माण होईल, असे फोटो व्हिडिओ प्रदर्शित करील. लाईक करील किंवा फॉरवर्ड करील, जुन्या पोस्ट आहेत. त्यांनी आम्ही दिलेल्या सूचनेनंतर पोस्ट केल्या नाहीत, तर अशा व्यक्तीविरुद्ध तत्काळ भारतीय न्याय संहिता, माहिती तंत्रज्ञान अधिनियम तसेच कायद्यान्वये योग्य ती कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक कावत यांनी दिला आहे.

police
Santosh Deshmukh case : आरोपीला पळवण्यासाठी सह्याद्रीवर बैठक झाली का? मनोज जरांगे आक्रम, देवेंद्र फडणवीसांना इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com