Ration card: रेशन कार्डचा नवा नियम! आता दुकानात धान्य आल्यानंतर मोबाइलवर येणार मेसेज

Ration card Rules: रेशन कार्डबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आता रेशन दुकानावर धान्य आले की नाही हे तुम्हाला एका मेसेजद्वारे समजणार आहे. रेशन कार्डधारकांना आता धान्य आले की नाही हे एका क्लिकवर कळणार आहे.
Ration Card
Ration CardSaam Tv
Published On

रेशन कार्ड हे महत्त्वाचे कागदपत्रं आहे. गरीब कुटुंबातील नागरिकांना कमीत कमी रुपयांमध्ये धान्य मिळावे, जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात, यासाठी रेशन कार्डचे वाटप केले आहे. रेशन कार्डवर तुम्हाला दर महिन्यात कमीत कमी रुपयांमध्ये रेशन मिळवते.यात आता नवीन अपडेट समोर आली आहे. तुमच्या धान्य दुकानावर रेशन आलं की त्याचा मेसेज तुम्हाला येणार आहे. त्यामुळे तुम्हाला रेशन दुकानावर जाऊन धान्य आलं की नाही हे सारखं विचारण्याची गरज भासणार नाही. (Ration Card Rules)

Ration Card
SBI Scheme: SBI ची ४०० दिवसांची धासू योजना! गुंतवणूकीवर मिळणार भरघोस व्याज

सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आह. पालघर जिल्ह्यात एकूण ४ लाख ३२ हजार ४१ लाभार्थी आहेत. त्यातील ९७ ९५९ हे अंत्योदयाचे लाभार्थी आहेत. तर उरलेले ३ लाख लाभार्थी हे प्राधान्य कुटुंबातील आहे.

आता नवीन नियमांनुसार तुम्हाला धान्य रेशन दुकानावर आल्यावर मोबाईलवर मेसेज येणार आहे. यासाठी तुम्हाला रेशन दुकानावर जाऊन आधार कार्ड आणि मोबाईल नंबरची नोंद करावी लागणार आहे. (Ration Card Rules News)

Ration Card
Post Office Scheme: ५००० रुपये गुंतवा अन् ८ लाख मिळवा; पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत होईल फायदाच फायदा

शासकीय गोदामातून धान्य दुकानाकडे रवाना केल्यानंतर परिसरातील लोकांना लगेचच एसएमएस पाठवला पाहिजे, असे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिले आहेत.

रेशन दुकानावर धान्य आले की नाही याचा मेसेज येण्यासाठी तुम्हाला आधी मोबाईल नंबर लिंक करावा लागणार आहे. ही प्रक्रिया विनामूल्य होणार आहे.तुम्हाला फक्त रेशन दुकानावर जाऊन मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे,

Ration Card
Government Scheme: तरुणांना मिळणार ५० लाखांची मदत, महाराष्ट्रातील रोजगार निर्मिती योजना नक्की आहे तरी काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com