Beed News
Beed NewsSaam tv

लग्‍नाच्‍या २१ व्‍या दिवशी नवविवाहित तरुणाचा संशयास्पद मृत्यू

लग्‍नाच्‍या २१ व्‍या दिवशी नवविवाहित तरुणाचा संशयास्पद मृत्यू
Published on

बीड : बीड जिल्ह्यात 22 वर्षीय नवविवाहित तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला. ही घटना बीडच्या गेवराई (Georai) तालुक्यातील निपाणी जवळका तांडा येथे घडली. (Maharashtra News)

Beed News
10 लाख रुपयांच्या चॉकलेट चोरल्‍या; गोडाऊनची डुप्लिकेट चावी बनवून नोकराने मारला डल्ला

पांडुरंग राजाभाऊ चव्हाण (वय 22) असे मयत तरुणाचे नाव आहे. पांडुरंग चव्हाण या तरुणाचा विवाह (Marriage) पौळाचीवाडी येथील मुलीसोबत झाला होता. लग्नाला 21 दिवस झाले होते. मात्र त्याच्या गळ्याला खुणा असलेल्या (Beed News) अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला आहे.

घातपाताची शक्‍यता

लग्‍नाला अवघे काही दिवस झाले असतानाच सदरची घटना घडली. त्यामुळे हा घातपात असल्याची शक्यता नातेवाईकांकडून वर्तवली जात आहे. दरम्यान या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com