Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांच्या मारेकऱ्याला पकडा, 50 लाख रुपये आणि 5 एकर जमीन जिंका; कुणी केली घोषणा?

Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राज्यात वातावरण तापलं आहे. दरम्यान, संतोष देशमुख यांचा एन्काउंटर करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला ५० लाखांचे बक्षीस जाहीर केलं आहे.
Pandharpur
PandharpurSaam tv
Published On

सध्या राज्यभरात गाजत असलेल्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी संपूर्ण राज्यात आंदोलने होत आहेत. या घटनेतील मुख्य आरोपीचा एन्काउंटर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला तब्बल पन्नास लाख रुपयांचे रोख बक्षीस व पाच एकर बागायत शेती देणार असल्याचे लेखी प्रतिज्ञापत्र माढा तालुक्यातील वडशिंगे गावचे शेतकरी कल्याण बाबर यांनी दिले आहे. (Beed)

बाबर यांनी स्टॅम्प पेपरवरती दिलेले हे लेखी प्रतिज्ञापत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. कल्याण बाबर यांच्या या आगळ्यावेगळ्या बक्षीसाची व प्रतिज्ञा पत्राची राज्यभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.अलीकडेच बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे. त्यांच्या हत्ये मागे राजकीय लोक असल्याची चर्चा सुरू आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीस अटक करावी, या मागणीसाठी राज्यभरात आंदोलने, निदर्शने केली जात आहेत. याच संदर्भात नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये देखील राज्यातील अनेक आमदारांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यानंतर आता माढा तालुक्यातील वडशिंगे येथील शेतकरी कल्याण बाबर यांनी संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपीचा एन्काऊंटर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला चक्क पन्नास लाख रुपये रोख व पाच एकर बागायत शेती देणार असल्याचे बक्षीस जाहीर केले आहे. शेतकरी कल्याण बाबर यांनी जाहीर केलेल्या या बक्षाची आता राज्यभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Pandharpur
CM Devendra Fadnavis News : बीड हत्याकांडाची एसआयटी चौकशी होणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

सव्वाशे एकर शेतीचे बागायतदार

कल्याण बाबर हे वडशिंगे येथील मोठे व प्रतिष्ठित बागायतदार आहेत. त्यांच्याकडे वडिलोपार्जित सुमारे सव्वाशे एकर शेती आहे. संपूर्ण शेती ही बागायती आहे. जवळपास अडीच ते तीन हजार टन ऊस त्यांचा दरवर्षी गाळपला जातो‌ याशिवाय इतर फळबागाचे क्षेत्र देखील मोठी आहे. कल्याण बाबर यांना देखील अशाच प्रकारचा स्थानिक गावगुंडांकडून त्रास झालेला आहे .‌ गावगुंडांकडून होणारा त्रास किती भयानक असतो याची त्यांना जाणीव झाल्यानंतर त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीचा इन्काऊंटर करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला हे बक्षीस जाहीर केले आहे.

Pandharpur
Maharashtra Politics : नाशिकच्या आमदारांमुळे छगन भुजबळांना डावललं? कोणत्या 4 कारणांमुळे कापला मंत्रिपदाचा पत्ता? पाहा स्पेशल रिपोर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com